कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदानाआधीच विजयाचे (challenge) गुलाल उधळला जाताना दिसत आहे. महाराष्ट्रात भाजपचा सर्वात पहिला उमेदवार हा भाजपातून निवडून आला. विशेष म्हणजे मतमोजणीला अजून 14 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख अजून दोन दिवसांवर आहे. असं असताना निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच कल्याण डोंबिवलीत उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी यांचा सर्वात आधी विजय झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर भाजपच्याच उमेदवा आसावरी नवरे यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर रंजना मितेश पेणकर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपची कल्याण डोंबिवलीतील ही विजयी घोडदौड सुरुच आहे. (challenge)भाजपचे केडीएमसीत आतापर्यंत 5 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे हे पाचही उमेदवार महिला आहेत. तर दुसरीकडे भाजपच नाही तर शिवसेना शिंदे गटालाही इथे बिनविरोध विजय मिळताना दिसत आहे. भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचेदेखील 4 उमेदवार इथे बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत निवडणुकीच्या निकालाआधीच तब्बल 9 उमेदवारांचा बिनविरोध विजय झाल्याचं चित्र आहे.
कल्याण-डोंबिवलीत महापालिका निवडणूक आत्तापर्यंत भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे प्रभाग क्रमांक. 24 मधून भाजपच्या ज्योती पवन पाटील विजय झाल्या आहेत. (challenge)तर भाजपच्या मंदा सुभाष पाटील प्रभाग क्रमांक 27 मधून बिनविरोध विजयी झाले आहे. रेखा राम यादव -चौधरी या प्रप्रभाग क्र. १८ (अ) मधून बिनविरोध विजयी झाल्यात. त्यापाठोपाठ आसावरी केदार नवरे यांची डोंबिवलीतील प्रभाग क्र. २६ (क) मधून बिनविरोध निवड झाली. तर रंजना मितेश पेणकर यांचा प्रभाग क्र. २६ (ब) मधून विजय झाला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत (challenge)प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे नगरसेवक पदाचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले असतानाच आता शिवसेनेची ही विजयी घोडदौड सुरूच आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्रमांक २८ येथील शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार हर्षल राजेश मोरे हे देखील बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे शिवसेनेच्या बिनविरोध विजयी झालेल्या नगरसेवकांची संख्या चार इतकी झाली आहे.शिवसेनेची ही विजयी वाटचाल अशीच सुरु राहणार असून इतर ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या या विजयामुळे इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांमध्ये देखील जल्लोषाचे वातावरण आहे. तर शहरातील सर्व शिवसैनिकांकडून विजय साजरा करण्यात येत आहे.
हेही वाचा :
प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,
महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य