‘तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाण यांनी ५०- ५० लाख रुपये घेतल.(claiming) त्यांनी कार्यकर्त्यांचा बळी घेतला असा गंभीर आरोप माजी नगरसेवकाने केले आहे. माजी नगरसेवकाच्या या आरोपामुळे नांदेडमधील राजकारण तापले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. मात्र माजी नगरसेवकाचे आरोप अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले. ‘कोणालाच पैसे मागितले नाही. अशोक चव्हाण यांची कारकीर्द ५० वर्षांची आहे.’, असे त्यांनी सांगितले.

नांदेड महापालिका निवडणुकीत तिकीट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक (claiming) चव्हाण यांनी उमेदवारांकडून ५०-५० लाख रुपये घेतल्याचा आरोप माजी नगरसेवकाने केला. भानुसिंह रावत हे १९८० पासून चव्हाण कुटुंबीयांशी एकनिष्ठ होते. अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर भानुसिंह रावत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक १६ मधून त्यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. उमेदवारी देण्याचा अशोक चव्हाण यांनी शब्दही दिला होता. मात्र त्यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही.शब्द देऊन सुद्धा अशोक चव्हाण यांनी उमेदवारी दिली नाही. त्यांनी दुसऱ्या उमेदवाराकडून ५०-५० लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप भानुसिं हरावत यांनी केला. भाजपने दिलेल्या एकूण ६६ उमेदवारांपैकी केवळ १८ भाजपच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्याचे रावत म्हणाले. कार्यकर्त्यांचा अशोक चव्हाण यांनी बळी घेतल्याचा आरोपही रावत यांनी केला आहे.

हिरवा भाजप कोण करते आहे हे जनतेला माहित झाले आहे.(claiming) देव त्यांना बघून घेईल असे भानुसिंह रावत यांनी सांगितले. दरम्यान, ‘उमेदवारी देण्यासाठी कोणालाही पैसे मागितले नाही. अशोक चव्हाण यांची कारकीर्द पन्नास वर्षांची आहे.’ अशी प्रतिक्रया देत अशोक चव्हाण यांनी भानुसिंह रावत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
हेही वाचा :
रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध
नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी
‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला