कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंतची कोणतीही निवडणूक आता पैशाच्या प्रचंड (supposedly) प्रभावाखाली आली आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हे कधीही न बदलणारे समीकरण भ्रष्टाचाराच्या प्रस्थापित व्यवस्थेतून तयार झाले आहे.परिणामी प्रामाणिक कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकला गेला आहे. आजच्या तुलनेत कालच्या निवडणुका सामान्य कार्यकर्त्याला लढवता येत होत्या. पण तरीही तेव्हा स्वस्तातल्या निवडणुका”महाग”च होत्या.अबब! एवढा प्रचंड खर्च कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत झाला?अशा अर्थाने तेव्हाच्या निवडणुकीची एका विदेशी वृत्तसंस्थेने दखल घेतली होती. शिवाय राज्यभर ही निवडणूक गाजली होती.इसवी सन 1972 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले.द्वारकानाथ कपूर हे पहिले प्रशासक होते. बी. एन. मखीजा, एम. एन. देवस्थळीडी.टी. जोसेफ हे आय एस अधिकारी इसवी सन 1978 पर्यंत या महापालिकेवर प्रशासक होते. 1978 मध्ये या महापालिकेची पहिली निवडणूक जाहीर झाली. साठ प्रभाग होते. तेव्हा 33% महिलांसाठी आरक्षण नव्हते.

महापालिकेचे पहिले सभागृह अस्तित्वात येणार म्हणून प्रशासनाने सभागृहाचे नूतनीकरण केले होते. निवडणुकीचा 35 दिवसांचा कार्यक्रम निवडणूक आयुक्तांनी जाहीर केला. (supposedly) तेव्हा आचारसंहिता होती पण त्याची माहितीच सामान्य जनतेला नव्हती. आचारसंहिता म्हणजे नेमके काय प्रकरण आहे हे माहीत करून घ्यावं असं तेव्हा कुणालाच वाटत नव्हतं.नामनिर्देशन पत्रे दाखल करताना पाचशे रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली होती. कार्यकर्त्यांसाठी उमेदवारांनी किती खर्च करायचा त्याचा एक तक्ताच तेव्हा देण्यात आला होता. भोजन बारा रुपये, चहा दोन रुपये, नाश्ता पाच रुपये असे दर निश्चित केले गेले होते. सध्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयुक्तांनी भोजनाचा खर्च 140 रुपये निश्चित केला आहे. 47 वर्षांपूर्वी भोजन चहा आणि नाश्ता यांचा एकत्रित खर्च अवघा 19 रुपये निश्चित केला गेला होता. तेव्हा लोकांच्या घरांच्या भिंती रंगून त्यावर उमेदवाराचे नाव आणि चिन्ह वगैरे पेंटर कडून रंगवून घेतले जायचे. प्रचाराचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे तेव्हा घरांच्या भिंती होत्या.
आजच्यासारखी प्रचाराची विपुल साधने तेव्हा उपलब्ध नव्हती. छापील निवेदने घरोघरी जाऊन वाटायची हा एक चांगला पर्याय केव्हा होता. ही निवेदने घरोघरी पोहोचवण्यासाठी लहान मुलांचा उपयोग करून घेतला जायचा. दहा-बारा कार्यकर्ते सोबत घेऊन उमेदवार प्रभागात प्रचार करायचे. लहान थोर मुलांच्या प्रचार फेऱ्याही काढल्या जात असत. कोल्हापूर महापालिकेची ही पहिली निवडणूक होती. महापौर या पदाची त्या काळात भलतीच क्रेझ होती. महापौरांसाठी लाल दिव्याची कार हे फारच मोठे आकर्षण होते. नगरपालिकेच्या मावळत्या सभागृहातील काही जणांना या नगरीचे प्रथम महापौर व्हावयाचे होते.त्यांनी तशी निवडणूकीचा निकाल लागण्यापूर्वीच फिल्डिंग लावली होती. त्यापैकी काही मंडळी नंतरच्या काळात महापौर झाली तथापि प्रथम महापौराचा मान त्यांना मिळाला नाही.
साठ सदस्यांचे सभागृह होते. साठ प्रभागात निवडणूक होणार होती.(supposedly) तेव्हा महापालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवर लढवण्याचा विचारही कोणी केला नव्हता.अगदी तेव्हाच्या राजकीय पक्षांना सुद्धा तसे वाटले नव्हते. त्यामुळे सर्वच उमेदवार अपक्ष होते. साठ प्रभागांसाठी तेव्हा एकूण 542 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.म्हणजे जवळपास प्रत्येक प्रभागात दहा जण अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत होते.तेव्हाचा सर्वसामान्य मतदार तसेच कार्यकर्ता हा उमेदवाराकडून चहाची अपेक्षा सुद्धा ठेवत नव्हता. प्रचार फेरी काढून झाल्यानंतरउमेदवाराच्या घरी कार्यकर्त्यांना कांदे पोहे किंवा वडापाव असा नाश्ता दिला जायचा. रोजच राबणाऱ्या खास कार्यकर्त्यांना दोन-तीन दिवसातून एकदा शाकाहारी जेवण दिले जात असे. तेव्हा मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील हॉटेल महाराजा हे फार प्रसिद्ध होते. तेथे शाकाहारी भोजन थाळी अवघी 12 रुपयाला मिळत असे. एवढ्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये उमेदवाराने जेवण देणे म्हणजे तेव्हाची चंगळ समजली जायची.

मांसाहारी जेवण, आणि त्याआधी मद्य हा प्रकारच तेव्हा अस्तित्वात नव्हता. (supposedly) आज या दोन गोष्टी दररोज रात्री असल्याशिवाय
कार्यकर्ता खुश होत नाही.निवेदने वाटण्यासाठी 600 रुपये रोज देऊन पेड कार्यकर्ते सध्या वापरले जात आहेत.
47 वर्षांपूर्वी झालेल्या इसवी सन 1978 सालच्या कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत 542 उमेदवारांनी केलेला एकूण एकत्रित खर्च हा दोन कोटी रुपयांचा होता. आणि तो त्यावेळी प्रचंड होता आणि म्हणूनच निवडणुकीवर झालेल्या खर्चाची दखल बीबीसी न्यूज एजन्सीने केव्हा घेतली होती. प्रचंड खर्चासाठी त्यावेळची निवडणूक गाजली होती.
हेही वाचा :
रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध
नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी
‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला