बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा स्पेशल 26 हा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच खरी घटना महाराष्ट्रातील सांगलीत घडली आहे. अक्षय कुमारच्या स्पेशल 26 या चित्रपटाप्रमाणे सांगलीतल्या कवठेमहांकाळमध्ये एका डॉक्टरच्या घरावर आयकर छापा टाकत कोट्यवधीचे सोने आणि रोकड(cash) लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आयकर विभागाकडून आल्याचा सांगत शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरात बोगस आयकर पथकाने रविवारी रात्रीच्या सुमारास प्रवेश केला. इतकंच नव्हे तर या पथकाने डॉक्टरांना सर्च वॉरंटदेखील दाखवले. त्यामुळं डॉक्टर म्हेत्रे यांचा विश्वास बसला. त्यांनी त्यांना घराची झडती घेण्यास परवानगी दिली.

डॉक्टर म्हेत्रे यांना सर्च वॉरंट दाखवत चौघांनी सिने स्टाईल पद्धतीने घराची झडती घेतली, ज्यामध्ये घरात असणारी 16 लाखांची रोकड(cash) तब्बल एक किलोच्या आसपास सोन्याचे दागिने असे जवळपास 2 कोटींची रोकड जप्त केल्याचे सांगून तिथून निघून गेले. मात्र त्यांनी पोबारा केल्यानंतर डॉक्टरांना संशय आल्याने डॉक्टरांनी कवठेमहांकाळ पोलिसांना याची माहिती दिली.

डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर लगेचच पोलिसांनी डॉक्टरांच्या घरी धाव घेत छापा बोगस असल्याचे लक्षात आहे. पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र तोतया आयकर विभागाच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट…

महाराष्ट्र देशी जात कलह वाढो ही इथल्या राजकारण्यांची इच्छा

‘दिवसाढवळ्या तो प्रायव्हेट पार्ट …’ सोहा अली खानसोबत धक्कादायक प्रकार, अभिनेत्रीने आता केला खुलासा