पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा आशिया(sports news) कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर स्पष्टपणे परिणाम झाला. भारताने एकातर्फी सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आणि या सामन्यादरम्यान असं काय घडले ते पाकिस्तान नेहमीच लक्षात ठेवेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.

रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया कप 2025 च्या गट अ सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानचे(sports news) प्रशिक्षक माइक हेसन अत्यंत संतापले. सूर्यकुमार यादवच्या संघाने सात विकेट्स आणि 25 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला आणि भारताने 16 षटकांत 128 धावांचे लक्ष्य गाठले. सामना संपल्यानंतर विजयी धावा काढल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये परतले.

टीम इंडियाने थेट सुपर-4 फेरीत आपले स्थान पक्के केले. सामना एकतर्फी ठरला असला, तरी पाकिस्तान अजून स्पर्धेबाहेर गेलेला नाही. भारताविरुद्ध पराभवानंतरही पाकिस्तानकडे संधी आहे. जर पाकिस्तानने आपल्या पुढील गट-सामन्यात यूएईवर विजय मिळवला, तर तोसुद्धा भारताबरोबर सुपर-4 मध्ये पोहोचेल. त्यामुळे भारत–पाकिस्तानची पुन्हा एकदा टक्कर होण्याची दाट शक्यता आहे. सुपर-4 टप्प्यात प्रत्येक संघ इतर सर्व संघांविरुद्ध एकदा खेळतो. त्यामुळे पाकिस्तान क्वालिफाय झाला तर 21 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारत–पाकिस्तानचा सामना रंगणार आहे.

अंतिम फेरीतही भिडंतीची शक्यता
जर भारत आणि पाकिस्तान सुपर-4 मध्ये अव्वल दोन स्थानांवर राहिले, तर 28 सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या अंतिम सामन्यात दोन्ही चिरप्रतिद्वंद्वी पुन्हा आमनेसामने येऊ शकतात. त्यामुळे या आशिया कपमध्ये भारत–पाकिस्तानचे तब्बल तीन सामने होण्याची दाट शक्यता आहे.

भारताने पाकिस्तानविरुद्धचा हा सामना अगदी सहज जिंकला. सुरुवातीला गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पाकिस्तानला 127 धावांवर रोखले. कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी मिळून विरोधी फलंदाजीचे कंबरडे मोडले. लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने जलद 31 धावा केल्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद 47 धावा करत विजय निश्चित केला.

हेही वाचा :

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट…

महाराष्ट्र देशी जात कलह वाढो ही इथल्या राजकारण्यांची इच्छा

‘दिवसाढवळ्या तो प्रायव्हेट पार्ट …’ सोहा अली खानसोबत धक्कादायक प्रकार, अभिनेत्रीने आता केला खुलासा