राजस्थान उदयपूरमध्ये तीन तरुणांनी मुंबईच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार (captive) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पीडित मुलीला एका इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामाच्या बहाण्याने उदयपूरला बोलावले होते. ही घटना सुखेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.डीएसपी राजेश यादव यांनी सांगितले की, मुंबईच्या मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, हिरणमगरी भागातील रहिवासी करण सिंग याने तिला चांगल्या पैशांचे आमिष दाखवून मुंबईहून उदयपूरला एका कार्यक्रमाच्या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी बोलावले.

उदयपूरला पोहोचल्यावर आरोपी तिला सुखेर पोलीस (captive)ठाण्याच्या हद्दीतील एका फार्महाऊसवर घेऊन गेले. तिला १० दिवस त्या फार्महाऊसवर ठेवण्यात आले. या काळात आरोपी करण आणि त्याचे मित्र हितेश व भूरा यांनी दारूची पार्टी केली. त्यांनी त्या मुलीलाही जबरदस्तीने दारू पाजली.
दारूच्या पार्टीनंतर आरोपी आणि त्याच्या मित्रांनी नशेत असताना त्या तरुणीवर बलात्कार केला. (captive)या दरम्यान, आरोपीचे इतर तीन साथीदारही फार्महाऊसवर उपस्थित होते. ती तरुणी फार्महाऊसमधून पळून गेली आणि गुरुवारी संध्याकाळी तक्रार दाखल करण्यासाठी एसपी कार्यालयात पोहोचली. या आधारावर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी करणला ताब्यात घेतले आहे. इतर दोन फरार आरोपींना अटक करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. वरिष्ठ अधिकारी स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले असून या प्रकरणावर विशेष लक्ष देत आहेत.
हेही वाचा :
इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव
कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकव