कोल्हापूरमध्ये हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांनी सामाजिक आणि आर्थिक चिंतेला चालना दिली आहे. सायबर गुन्हेगार आता डिपफेक(Deepfake) तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे चेहरे किंवा आवाज तयार करतात, ज्यामुळे लोकांची आर्थिक आणि भावनिक फसवणूक केली जाते.

विशेषतः सोशल मीडियावर खोट्या नावाने आकर्षक प्रोफाइल तयार करून लोकांना भावनिक जाळ्यात अडकवले जाते. सुरुवातीला साध्या संवादातून विश्वास मिळवला जातो, नंतर खासगी फोटो किंवा व्हिडिओचा उपयोग करून ब्लॅकमेलिंग केले जाते. आपल्या प्रतिष्ठेला धोका होईल याच्या भीतीने अनेक जण त्वरित पैसे देतात.

सर्वसाधारणपणे जानेवारी २०२४ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत, कोल्हापूरमध्ये(Deepfake) सायबर तक्रारींची संख्या २,१९१ इतकी नोंदवण्यात आली आहे. यातील आर्थिक फसवणुकीची एकूण रक्कम २३,९५,७५,१३१ रुपये आहे. गुन्ह्यातील २ कोटी ८२ लाख ५५ हजार रुपये गोठवण्यात आले असून, तक्रारदारांना ६४ लाख ६२ हजार ४७१ रुपये परत करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत १८ संशयित आरोपी पकडण्यात आले आहेत.

गुन्ह्यांचे स्वरूप प्रगत तंत्रज्ञानामुळे अधिक क्लिष्ट झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखाद्याचा चेहरा वा आवाज हुबेहूब तयार करून खोटे व्हिडिओ बनवले जातात, ज्यामुळे खरे आणि खोटे ओळखणे कठीण होते. या प्रकारामुळे फक्त शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील लोकही सायबर फसवणुकीच्या सापळ्यात अडकत आहेत.

कोल्हापूर पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या मागण्यांकडे विशेष काळजी घेण्यास आवाहन केले आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! माजी क्रिकेटपटू युवराज सिंह ED च्या कचाट्यात

आईचे ते बोल मनाला लागले अन् 18 वर्षांच्या मुलीने संपवले जीवन, घरातील जिन्यातच….

लिफ्ट कोसळली! थरारक घटनाक्रम CCTV मध्ये कैद; लिफ्टमधल्या सहाजणांचं