महाराष्ट्र सध्या गंभीर दुष्काळाचा सामना करतोय… राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत आणि आता (Maharashtra) त्यात आणखी १८ तालुक्यांचा समावेश केला जाणार आहे. या गंभीर टंचाईमुळे राज्यातील शेतकरी, मजूर आणि ग्रामीण भागाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय पातळीवर विविध पावले उचलली जात आहेत. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचाही महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. या अशा परिस्थितीत आयपीएल २०२७ महाराष्ट्रात होईल का

भविष्यात पाणी टंचाईची गंभीर समस्या महाराष्ट्रासमोर उभी राहू शकते आणि त्यामुळेच आतापासूनच १० टक्के पाणी कपात लागू केली गेली आहे. मान्सूनमधील मोठा खंड आणि एल निनोच्या प्रभावामुळे धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा पुढील वर्षापर्यंत (३१ ऑगस्ट २०२७) पुरवून वापरण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. परिस्थिती न सुधारल्यास ही कपात आणखी वाढू शकते. सध्या धरणांमधील पाणीसाठा आधी पिण्यासाठी, नंतर पशुधनासाठी आणि चाऱ्यासाठी राखीव ठेवला जाईल. (Maharashtra) त्यानंतरच रब्बी पिकांच्या सिंचनासाठी पाणी सोडले जाईल असे सरकारचे निर्देश दिले आहेत. अशात आता वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमिअर लीग २०२७ चे सामने होतील का? हा प्रश्न आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाची हिरवळ आणि खेळपट्ट्या टिकवून ठेवण्यासाठी एका वेळी साधारण ८०,००० ते १,००,००० लीटर पाणी लागते. आयपीएल दरम्यान स्टेडियमच्या खेळपट्टी व मैदानाची देखभाल करण्यासाठी दररोज १०,००० लीटर क्षमतेचे सुमारे ५ खाजगी टँकर्स लागतात. संपूर्ण आयपीएल हंगामातील (सुमारे ७ ते ८ सामन्यांसाठी) खेळपट्ट्या आणि मैदानाची गुणवत्ता राखण्यासाठी ४० लाख लीटरपेक्षा जास्त पाण्याचा वापर केला जातो. पण, इंडियन एक्सप्रेसने २०१६ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार मैदानाची दुरुस्ती आणि खेळपट्ट्या ओल्या करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशने मुंबई महानगरपालिकेचे पिण्याचे पाणी वापरत नाही.
वानखेडेने मैदानासाठी अत्याधुनिक नॅनोबबल वॉटर सिस्टीमचा वापर सुरू केला आहे. हे तंत्रज्ञान जमिनीची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता कमालीची वाढवते, (Maharashtra) ज्यामुळे मैदानाची हिरवळ राखण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण खूप कमी होते आणि कमी टँकरच्या पाण्याचा पुनर्वापर सुलभ होतो. एमसीए आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या स्टेडियम्समध्ये ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम राबवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून पावसाचे पाणी साठवून ते भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी किंवा नंतरच्या वापरासाठी साठवता येईल. असे असले तरी २०२७ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होतील का
२०१६ मध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती आणि तेव्हा महाराष्ट्र राज्यात खेळले जाणारे आयपीएलचे १३ सामने दुसरीकडे हलवावेत, असा निकाल बॉम्बे उच्च न्यायालयाने दिला होता. महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळामुळे मुंबई, पुणे आणि नागपूर येथे सामने आयोजित करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेनंतर हा निकाल आला होता. तुर्तास तरी आयपीएल खूप लांब आहे, परंतु दुष्काळाची तीव्रता पाहिल्यास आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर झाल्यास आश्चर्य वाटायला नको… अजूनतरी याबाबत चर्चा सुरू झालेली नाही.
हेही वाचा :
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार