भारताच्या वनडे सामन्याबाबत खोटी बातमी BCCI ला स्पष्टीकरण द्यावं लागलं, अफवांमागचं सत्य सांगितलं

दिल्ली वनडेच्या ठिकाणाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. भारत-श्रीलंका सामन्याच्या शिफ्टिंगची बातमी BCCI ने चुकीची ठरवली आहे.

श्रीलंकेचा संघ डिसेंबरमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दिल्लीत होणारा एकदिवसीय सामना अहमदाबादला हलवला जाईल, असे वृत्त होते. (India-Sri Lanka) परंतु बीसीसीआयने आता हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, एकदिवसीय सामना दिल्लीतून हलवला जात असल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. बीसीसीआयने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

हा एकदिवसीय सामना १३ डिसेंबर रोजी खेळला जाईल. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, तो अरुण जेटली स्टेडियमवर आयोजित केला जाईल. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिल्ली एकदिवसीय सामना अहमदाबादला हलवला जात असल्याच्या वृत्तांचे खंडन केले. ते म्हणाले, “भारत-श्रीलंका एकदिवसीय सामना दिल्लीहून अहमदाबादला हलवला जाणार असल्याची वृत्ते खोटी आहेत. बीसीसीआयने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

वेळापत्रकाच्या अद्ययावत माहितीसाठी प्रसारमाध्यमांनी बीसीसीआयची अधिकृत प्रसिद्धीपत्रके पाहावीत, अशी आम्ही विनंती करतो. द्विपक्षीय मालिकांचे सामने एका धोरणानुसार शहरांना वाटप केले जातात, असं सांगण्यात आले आहे. आता प्रश्न असा आहे की, भारत-श्रीलंका एकदिवसीय सामना दिल्लीतून हलवला जाईल असे वृत्त का आले होते? डीडीसीएल अरुण जेटली स्टेडियममध्ये नूतनीकरण करण्याची योजना आखत असल्याच्या बातम्या होत्या. (India-Sri Lanka) यामध्ये खेळपट्टी आणि मैदानाबाहेरील भागाचे नूतनीकरण करणे, तसेच आधुनिक ड्रेनेज प्रणाली बसवणे यांचा समावेश होता. या नूतनीकरणामुळे सामने दुसऱ्या ठिकाणी हलवले जाण्याची शक्यता होती, परंतु बीसीसीआयने आता हे स्पष्टपणे नाकारले आहे.

श्रीलंका आणि भारत यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १३ डिसेंबर रोजी दिल्लीत खेळवला जाणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना १६ डिसेंबर रोजी बंगळूरुमध्ये खेळला जाणार आहे. (India-Sri Lanka) तिसरा एकदिवसीय सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यातील पहिला टी२० सामना २२ डिसेंबर रोजी राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा टी२० सामना २४ डिसेंबर रोजी कटकमध्ये होणार आहे. तिसरा टी२० सामना २७ डिसेंबर रोजी पुण्यात खेळवण्यात येईल.

हेही वाचा : 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार

कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी तत्काळ करा