भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल सागरी सुरक्षेला मिळणार बळ

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ या नव्या पाणबुडीविरोधी युद्धनौकेचा समावेश झाला आहे. आधुनिक शस्त्रास्त्रे आणि प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या युद्धनौकेमुळे सागरी सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात उथळ समुद्रातील पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असलेली ‘मंगरोल’ ही तिसरी पाणबुडीविरोधी युद्धनौका सोमवारी दाखल झाली. या युद्धनौकेमुळे विशेषतः किनारी भाग, बंदरे आणि सागरी मार्गाच्या सुरक्षेसाठी नौदलाची क्षमता वाढणार आहे. (Indian Navy) कोची येथील कोचीन लिमिटेड ने (सीएसएल) या शिपयार्ड युद्धनौकेची निर्मिती केली आहे. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल संजय वत्सायन या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘मंगरोल’ युद्धनौका प्रगत शस्त्रास्त्रे आणि सैन्सर प्रणालीनी सज्ज आहे. (Indian Navy) यामध्ये’ अभय’ हुल-माउंटेड सोनार, हलके टॉर्पडी, स्वदेशी पाणबुडीविरोधी रॉकेट प्रक्षेपक आणि ‘मारीच’ ही प्रगत टॉपेंडो डिकॉय प्रणाली यांचा समावेश आहे. या उपकरणांच्या मदतीने शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांच्यापासून निर्माण होणारा धोका कमी करता येणार आहे. ही युद्धनौका सागरी गस्ती विमाने, हेलिकॉप्टर आणि अन्य युद्धनौकाशी समन्वय साधून काम करू शकते. पाण्याखालील निगराणी, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा आणि सागरी सुरुंगांशी संबंधित मोहिमांमध्येही तिचा वापर करता येईल. तीन डिझेल इंजिन आणि वॉटरजेट प्रणोदन प्रणालीमुळे ‘मंगरोल’ उथळ समुद्रात वेगाने दिशा बदलून प्रभावी हालचाली करू शकते.

या युद्धनौकेच्या निर्मितीत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे, (Indian Navy) त्यामुळे भारताची युद्धनौका बांधणी आणि आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे. गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील मंगरोल या किनारी शहरावरून युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे. ही नौका पूर्वीच्या आयएनएस मंगरोलचा वारसा पुढे चालवते. पूर्वीच्या नौकेने एप्रिल २००४ पर्यंत भारतीय नौदलात सेवा बजावली होती, ‘मंगरोल’ च्या समावेशामुळे देशाच्या किनारी सागरी सुरक्षेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : 

अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच कांद्याचा भाव धाडकन कमी सामान्यांना मोठा दिलासा

 महाराष्ट्रात दुष्काळ, आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात हलवणार कदाचित संपूर्ण स्पर्धाच भारताबाहेर

शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही