पुण्यातील MPSC आंदोलन स्थगित, राज ठाकरे यांचा विवेकानंद पाटील याला फोन, थेट

एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर विद्यार्थी आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील त्याच्या मूळ गावी परतला. (student) त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्याशी संपर्क साधला. काय मोठी घडामोड

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर आता या आंदोलनातील विद्यार्थी नेत्यांची अजूनही क्रेझ ओसरली नसल्याचे समोर आले आहे. 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याने आणि चौकशी समिती स्थापन केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हे आंदोलन आपल्या धारदार आणि खास कोल्हापूर लहेजाने गाजवणाऱ्या विवेकानंद पाटील याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केला. मुंबईला भेटण्यासाठी बोलावल्याची माहिती त्याने दिली.

एमपीएससीच्या आंदोलनात कोल्हापूरमधील विवेकानंद पाटील याच्या सडेतोड भाषणाने तरुणाच्या काळजाचा ठाव घेतला. (student) त्यांच्या उत्स्फुर्त आणि मुद्देसुद भाषणाची राज्याच चर्चा झाली. त्याचा हजरजबाबीपणा आणि कोल्हापूर लकबीने त्याने भाषणं गाजवली. भाजपच्या अनेक नेत्यांना त्याने शिंगावर घेतले. त्यांना तोडीसतोड उत्तर देताना त्याने मर्यादा सोडल्या नाहीत. त्याचं ही अनेकांनी कौतुक केलं. त्याच्या भाषणातून कोल्हापूरच्या तालमीतील या रांगड्या गड्यानं अनेकांना घाम फोडला. या आंदोलनाला अनेक नेत्यांनी, फर्राटेदार, फक्कड, लांबपल्ल्याची भाषणं करणाऱ्यांनी भेटी दिल्या. त्या सर्वांनीच विद्यानंदचं कौतुक केलं.

आंदोलनानंतर गावी पोहचलेल्या विवेकानंद पाटील याने आंदोलन काळातील आठवणी जागवल्या. आमदार रोहित पवार, आमदार विश्वजीत कदम हे कायम सोबत होते. उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे हे वारंवार फोन करून विचारपूस करत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या आंदोलनाला हजेरी लावली. तर त्यांचा नुकताच फोन येऊन गेला. लढ्याला यश मिळालं. आता मुंबईला येऊन भेटून जा, असा निरोप राज ठाकरे यांनी दिल्याचे विवेकानंदने सांगितले. आता आपण मुंबईला जाऊन राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्याने सांगितले.

आपल्या भाषणांनी आंदोलनाला चारचांद लावणारा विवेकानंद पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी माजगाव येथे परतला. राधानगरी तालुक्यातील (student) त्याच्या मूळ गावी गावकऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. विद्येच्या माहेरघरात कोल्हापूरचा फड गाजवणाऱ्या विवेकानंदाचं गावकऱ्यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे या पठ्ठ्याने गावातही जोरदार भाषण ठोकले. उपस्थितांनी त्यांच्या भाषणाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

हेही वाचा : 

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी

पुढील 5 दिवस 5 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ सूर्य-बुध देणार साथ

पावसाळा संपला, तरी माणगंगेची तहान भागेना नदीपात्र कोरडे ठाक