MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?

मास कॉपी, मैदानी चाचणीत घोळ, मेडिकल चाचणीत घोळ अशा प्रकारे आपल्या मर्जीतील उमेदवारांनाच फायदा पोहोचवण्यासाठी आयोगातील अधिकाऱ्यांपासून ते गृहविभागातील अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी मोठा भ्रष्टाचार करून विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत गैरप्रकार केले आहेत, असा दावा रोहित पवार त्यांनी केलाय.

राज्यात सध्या पेपरफुटीचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षांचे पेपर फुटले आहेत. त्यामुळेच राज्यातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनीदेखील हा मुद्दा लावून धरला असून त्यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीय. विशेष म्हणजे त्यांनी याच मागणीला घेऊन 27 सप्टेंबर रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केलीय. (malpractices) दरम्यान, आता एकीकडे या आंदोलनाची तयारी केली जात असताना आता दुसरीकडे रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर व्हॉट्सअॅप चॅटिंगचा एक स्क्रीनशॉट शेअर करून खळबळ उडवूीन दिली आहे. त्यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या तारखेसंदर्भात चॅटिंग केली जातेय. हा गोपनीयतेचा भंग असल्याचा दावा त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केलाय.

राज्यात MPSC कडून विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत घोटाळा झाल्याचे आम्ही वारंवार सांगितले आहे. याबाबत आयोगातील उपसचिव असलेले अधिकारी दिलीप वाघे यांची भूमिका संशयास्पद असूनही अद्याप आयोगाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. (malpractices) तसेच उच्चपदस्थ अधिकारी अशा प्रकारे उमेदवारांशी चॅट करत असेल, तर हा गोपनीयतेचा भंग नाही का? असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.

मास कॉपी, मैदानी चाचणीत घोळ, मेडिकल चाचणीत घोळ अशा प्रकारे आपल्या मर्जीतील उमेदवारांनाच फायदा पोहोचवण्यासाठी आयोगातील अधिकाऱ्यांपासून ते गृहविभागातील अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी मोठा भ्रष्टाचार करून विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत गैरप्रकार केले आहेत, असा दावा त्यांनी केलाय. तसेच एमपीएससी आयोग आतून-बाहेरून पूर्णतः पोखरला गेला आहे. आयोगाचा क्लीनअप करायचाच असेल, तर छोटे मासे पकडून काहीही होणार नाही; (malpractices) त्यासाठी मोठा मासा पकडणे गरजेचे आहे आणि अध्यक्षांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे शक्य नाही, असा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला. त्यामुळे आता सरकार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यांवर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट?

सरकारला सदबुद्धी देवो शरद पवारांचा शनिवारी मोर्चा दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार?

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी सलग 3 दिवस बँका बंद, कामं आधीच उरकून घ्या?