काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी सरकारकडे एक मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने सरसकट मदतीचं आश्वासन दिले होते. मात्र तसे केले नाही. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. (farmers) तसेच त्यांनी सहकार मंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असं आश्वासन दिले. समृद्धी महामार्गाच्या आसपासची पाहणी केली. शेतकऱ्यांवर संकट आहे. शेतकऱ्यांकडे पैसे नाही. हातातले पिक गेले आहे. त्यांना वर्ष काढणे कठीण आहे. शेतकऱ्यांना एक लाख मदतीची अपेक्षा होती. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना नाही, असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं आहे.(farmers) यानंतक त्यांनी एक थेट सवाल केला आहे.
ते म्हणाले की, सरकार मुहूर्त कसला शोधत आहे? थातुर मातुर जीआर काढला. जुन्या जीआरमधील तरतूद यात आहे. त्यात तालुका निहाय पाऊस तूट आणि कृषी आयुक्त अहवाल नाही. सरसकट मदत करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते. पण मदत सरसकट केली नाही. या जीआरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जवसुली स्थगिती कशी होणार? तातडीने कर्जमाफी करायला हवी होती, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, कर्जाचे पुनर्गठन करायचे ठरवले आहे. म्हणजे शेतकरी पुन्हा कर्जाच्या बोझ्याखाली जाणार. यातून काय फायदा होणार? शेतकऱ्यांचा कळवला असेल तर चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये पाऊस कमी पडला त्याचा समावेश केला पाहिजे. हेक्टरी एक लाख मदत करा. हेक्टरी मदत करताना अडीच हेक्टर मर्यादा ठेवू नका. पीककर्ज जाचक अटी शर्तीशिवाय माफ करावे, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच पुढे त्यांनी सहकार मंत्र्यांवरही टीका केली आहे.
सहकार मंत्र्यांवर बोलताना ते पुढे म्हणाले की, नुसता दुष्काळ जाहीर केला. पण मदत द्यायला वेळ लागणार, असं सहकार मंत्री सांगतात. (farmers) म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसतात. मंत्री काजू बदाम खातात पण मदत द्यायला मात्र उशीर लावतात. पंचनामे करायचा मुहूर्त ५ ऑक्टोबर आहे. शेतकरी जगणार कसा? अशा पद्धतीने ही शेतकरी फसवणूक आहे. हा जीआर कोरडा आहे. द्यायचं असेल तर मदत त्वरित जाहीर करा, अशा शब्दात वडेट्टीवारांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे यावर रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोरड्या दुष्काळाची घोषणा करताना ज्या उपाययोजना सरकारने जाहीर केल्या त्याही कोरड्या ठाक आहेत. २६५ तालुक्यात आज पहिला ट्रिगर लागू केला असला तरी किमान ३ आठवडे आधी हे ट्रिगर लागू करायला हवे होते.
हेही वाचा :
सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट?
सरकारला सदबुद्धी देवो शरद पवारांचा शनिवारी मोर्चा दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार?
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी सलग 3 दिवस बँका बंद, कामं आधीच उरकून घ्या?