साताऱ्यात भीषण अपघाताचा थरार, महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्यांवर काळाचा घाला, 4 जिगरी मित्रांचा जागीच मृत्यू

साताऱ्यात भीषण झाला. महालक्ष्मीच्या दर्शनावरून परताना चार मित्रांवर काळाने घाला घातला. भीषण अपघातात 4 जिगरी मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

साताऱ्यात कराडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. साताऱ्यातील पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री 11 वाजता कार आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात 4 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्व मित्र हे कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून घरी परतत असताना त्यांची कार एका ट्रकला धडकली. (accident) यात चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरहून साताऱ्याला परतताना घात झाला मिळालेल्या माहितीनुसार, सर्व तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूरला गेले होते. कोल्हापुरात महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर रात्री साताऱ्याच्या दिशेने निघाले. रस्त्यावर असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. अपघातातील सर्व तरुण हे साताऱ्यातील खटावच्या कातरखटावचे आहेत. (accident) काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या उड्डाणपुलावर त्यांच्या कारचा अपघात झाला. या उड्डाणपुलावरील हा पहिलाच अपघात असल्याचे सांगितले जात आहे. तर या अपघातामधील जखमींवर कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

अपघातातील मृतांची नावे आली समोर अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे समोर आली आहेत. तेजस देशमुख (चालक वय- 25 वर्षे), सागर निंबाळकर (वय-23 वर्षे), सुयश चिंचकर (वय-20 वर्षे), रोहित धोत्रे (वय-21 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत. ऋतुराज दुबळे (वय-21 वर्षे), शंतनू शिंगाडे (वय-20 वर्षे), अमन तांबोळी (वय-23 वर्षे) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. कातरखटाव गावातील तरुणांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण मुलांच्या अपघाती मुलाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ज्या उड्डाण पुलावर हा अपघात झाला. (accident) तो काही दिवसांपूर्वी खुला करण्यात आला होता. या अपघातामुळे उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित झाली आहे. या अपघातानंतर नागरिकांकडून रस्ते सुरक्षा वाढवावी अशी मागणी होऊ लागली आहे. नागरिकांच्या मागणीवर आता स्थानिक प्रशासन काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : 

संपूर्ण सांगली जिल्ह्याचा दुष्काळाच्या कक्षेत समावेश

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सांगली दौऱ्यावर

कांद्याच्या दरात 500 रुपयांची वाढ