मद्यप्रेमींना जोर का झटका आज चार वाजेपासून ड्राय डे, किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आज चार वाजेपासून दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात दारू विक्रीस पूर्णपणे मज्जाव असणार आहे. महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाच जागांवर विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. (liquor) ज्यामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघ अशा पाच मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान या पाचही मतदारसंघात येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे, मतदारांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या पाच जागांसाठी एकून 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नागपूर पदवीधर मतदारसंघातर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व दारूचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 21 ऑक्टोबर म्हणजे आज सांयकाळी चार वाजेपासून ते 23 ऑक्टोबर सायंकाळी चारवाजेपर्यंत नागपूर पदवीधर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय डे असणार आहे. या काळात दारूची सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला असून सर्व मद्यविक्रेत्यांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. (liquor) त्यामुळे या दोन दिवसांच्या काळात या भागांमध्ये पूर्णपणे ड्राय डे असणार आहे. दारू मिळणार नाहीये.

राज्यात पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये दोन शिक्षक तर तीन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी पाच जागेसाठी एकूण 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी करण्यात येणार आहे.(liquor) दरम्यान या निवडणुकांसाठी पाच मतदारसंघात मिळून मतदानासाठी एकूण 2 हजार 419 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानादरम्यान मतदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दारू बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातर्गत येणाऱ्या जिल्ह्यांसाठीच हा आदेश लागू असणार आहे.

हेही वाचा : 

संपूर्ण सांगली जिल्ह्याचा दुष्काळाच्या कक्षेत समावेश

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सांगली दौऱ्यावर

कांद्याच्या दरात 500 रुपयांची वाढ