इचलकरंजी घटस्फोटानंतर विभक्त झालेले पती-पत्नी पुन्हा एकत्र आले. दोन महिन्यांत पुन्हा संसाराची घडी बसवण्यासाठी सहजीवनाला सुरुवात केली. आठवडाभरात पुन्हा विवाह करण्याची तयारीही सुरू होती; मात्र कौटुंबिक वाद विकोपाला गेला आणि वैशालीने पती सागर बुरसे याच्या डोक्यात खलबत्ता घालून संसाराची नव्याने घडी बसवण्यापूर्वीच संसार हाताने उद्ध्वस्त केला.

गावभागातील त्रिशूळ चौक परिसरात राहणारा सागर बुरसे हा महापालिकेचा कर्मचारी असून तांबे माळ येथील पाण्याच्या टाकीवर रखवालदारीचे काम करीत होता. २०१५ मध्ये त्याचे तारदाळमधील वैशाली हिच्याशी लग्न झाले होते. या दाम्पत्याला नऊ वर्षांची मुलगी आहे. वर्षभरानंतर वारंवार खटके उडू लागल्याने दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेत सोडपत्र केले. त्यानंतर वैशालीचे कोल्हापुरातील आणखी एकाशी लग्न झाले; (Ichalkaranji) मात्र काही महिन्यांपूर्वी हे नातेही संपुष्टात आले. महिनाभरापूर्वी पुन्हा मुलगी आणि वैशाली यांचे सागर याच्याकडे येणे-जाणे सुरू झाले. गणेशोत्सवापूर्वी सागर याच्याकडे वैशाली व मुलगी वास्तव्यास होते.
पुन्हा आणाभाका घेत नव्याने संसार थाटण्याचे त्यांनी निश्चित केले. नातेवाईकांनीही त्यांना पाठबळ दिले. आठवडाभरात त्यांचा पुन्हा नव्याने विवाह होणार होता. हे दाम्पत्य नवरात्रौत्सवानिमित्त नातेवाईकांसह देवदर्शनालाही गेले होते; मात्र पहाटे नव्याने जुळलेली संसाराची घडी वैशाली हिच्या टोक्याच्या निर्णयाने उद्ध्वस्त झाली. वैशालीने कौटुंबिक वादातून सागर झोपेत असताना त्याच्या डोक्यात खलबत्ता घातला.(Ichalkaranji) यात सागरचा जागीच मृत्यू झाला आणि या नात्याचा रक्तरंजीत शेवट झाला. वैशाली हिच्या कृत्याने नातेवाईक हादरून गेले आहेत. आई आणि बहिणीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नव्या संसाराची घडी बसवताना वैशाली हिने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कोडे त्यांना सतावत होते.
सागर बुरसे व वैशाली या दाम्पत्याला नऊ वर्षांची मुलगी आहे. चौथी इयत्तेत ती शिक्षण घेत आहे. पहाटेच्या सुमारास शेजार्याने सागर व वैशाली या दोघांना घराबाहेर बसल्याचे पाहिले होते; मात्र सकाळी १० पर्यंत मुलीला वैशाली हिने घरात येऊ दिले नाही. ती बाहेरच थांबून होती. (Ichalkaranji) त्यामुळे शेजार्यांना काहीतरी विपरीत घडल्याचा संशय होता. खुनाच्या घटनेमुळे मुलीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र तर हिरावून घेतलेच शिवाय आई खुनाच्या आरोपात अडकल्याने मुलगी पोरकी झाली.
हेही वाचा :
दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार
आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव
आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा