आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत झटपट, चविष्ट आणि पौष्टिक(requires) खाण्याच्या शोधात आपण अनेक पर्याय निवडतो. त्यातलाच एक लोकप्रिय पर्याय म्हणजे एग बर्गर. अंडा हा प्रोटीनचा समृद्ध स्रोत आहे आणि बर्गर हा सर्वांचाच आवडता स्नॅक! या दोघांचा संगम म्हणजे एग बर्गर, हे सहज, कमी वेळात आणि घरच्या घरी तयार करता येतंतोच तोच बोरिंग नाश्ता करून कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन चविष्ट खाण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सकाळच्या धावपळीत अनेकदा नाश्त्यासाठी आपल्याला फारसा वेळ मिळत नाही. अशावेळी एग बर्गर तुमच्यासाठी एक झटपट असा नाश्ता ठरेल. हा मुलांच्या टिफिनसाठीही एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य
अंडी – २
बर्गर बन – २
कांदा – १ मध्यम चिरून
टोमॅटो – १ पातळ चकत्या
लेटस – ४-५ पाने
चीज स्लाइस – २
मेयोनीज – २ टेबलस्पून
टोमॅटो सॉस – २ टेबलस्पून
तेल / बटर – १ टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
मिरीपूड – १/२ टीस्पून
मस्टर्ड सॉस ऐच्छिक – १ टीस्पून
भाज्या, मसालेदार सूप (requires)आणि नूडल्सचे संमिश्र… तिबेटियन Thukpa कधी ट्राय केलाय का? जाणून घ्या रेसिपी

कृती:
एग सॅंडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम तवा गरम करून त्यावर थोडं तेल घाला
यानंतर एका वाटीत दोन अंडी फोडून फेटून घ्या
त्यात थोडं मीठ व मिरीपूड टाका,(requires) यामुळे त्याची चव वाढेल
आता अंड्याचे हे मिश्रण तव्यावर टाका आणि ऑम्लेट दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या
बर्गर बन मधून अर्धं कापावं आणि दोन्ही बाजूंना थोडं बटर लावून थोडं खरपूस भाजून घ्या बर्गरच्या खालच्या भागावर आधी मेयोनीज लावा आणि मग त्यावर लेटसची पाने ठेवानंतर फ्राय केलेलं अंड्याचं ऑम्लेट ठेवा
मग त्यावर कांद्याच्या आणि टोमॅटोच्या चकत्या ठेवा
चीज स्लाइस ठेवा आणि वरून मस्टर्ड सॉस व टोमॅटो सॉस लाव
शेवटी बर्गर बनचा वरचा भाग ठेवा आणि तयार बर्गर एका प्लेटमध्ये काढून घ्या
अशाप्रकारे अवघ्या काही मिनिटांतच तुम्ही टेस्टी असा अंडा बर्गर तयार करू शकता
याला टोमॅटो सॉस अथवा चिप्ससह खाण्यासाठी सर्व्ह करा
हेही वाचा :
अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम चाहत्यांना धक्का..!
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया