सोशल मीडियावर सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) संदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये १ नोव्हेंबर २०२६ पासून बँकेतील सर्व खाती बंद करण्यात येणार (SBI accounts) असून ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यासही बंदी घालण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. बँकेने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर आढळल्याची माहिती समोर आली होती. (SBI accounts) या घटनेनंतर ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात बँकेनेही माहिती दिली होती. ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीशी संबंधित या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची चौकशी CERT-In या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत केली जात आहे. मात्र, ग्राहकांच्या खात्यातील पैसे सुरक्षित असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. (SBI accounts) तसेच बँकेचे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू आहेत. ग्राहकांची खाती बंद करणे किंवा त्यांना पैसे काढण्यापासून रोखणे, असा कोणताही निर्णय बँकेने घेतलेला नाही.
म्हणजेच काय तर, स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्व खाती १ नोव्हेंबर २०२६ पासून बंद होणार आणि पैसे काढण्यावर बंदी घातली जाणार, हा सोशल मीडियावरील दावा चुकीचा आहे. ग्राहकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी बँकेच्या अधिकृत माध्यमातून खात्री करून घ्यावी असे आवाहन बँकेमार्फत करण्यात आले आहे.
हेही वाचा :
मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश
अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात