शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकार एका एकरमागे 15000 हजार रुपये देणार आहे. त्यासाठी अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना आणत आहे. सरकार कृषक उन्नती योजनेअंतर्गत आर्थिक मदतीची देखील घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत भात शेतीऐवजी मका, कापूस , नाचणी पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर 15000 रुपये दिले जातील, अशी घोषणा छत्तीसगड सरकारने केली आहे.

जे आधीपासून या पिकांची लागवड करत आहे, त्यांना 10 हजार रुपये प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाणार आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटींची पूर्तता पूर्ण करावी लागणार आहे. कृषक उन्नती योजनेतअंतर्गत शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकांची लागवड करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. मागील खरीब हंगामात भाताची लागवड करत होते. जर त्यांनी यंदा खरीप हंगामात इतर पिकांची लागवड केली, तर त्यांना प्रति एकर 15 हजार रुपये दिले जातील. (farmers) यासाठी शेतकऱ्यांना एका एकरात कडधान्ये, तेलबिया, मका, नाचणी किंवा कापूस या पिकांची लागवड करावी लागेल. तर या पिकांची आधीच लागवड केली असेल, तर या शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रति एकर दिले जातील.
सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या योजनेशी संबंधित पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच 15 हजार रुपये पाहिजे असतील, तर यंदाच्या खरीप हंगामात इतर पिके घ्यावी लागतील. (farmers) त्यानंतर सरकारच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. या व्यतिरिक्त मागील हंगामात शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली असेल, तर त्याचीही नोंदणी असणे गरजेचे आहे.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चित वेळेत नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी 31 ऑक्टोबर 2026 याआधी नोंदणी करावी लागणार आहे. (farmers) त्यामुळे शेतकऱ्यांना या तारखेआधीच नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नोंदणी आणि संबंधित माहितीसाठी स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला देण्यात आलाय. ही मदत छत्तीसगडमधील नागरिकांसाठी आहे. तर महाराष्ट्रात दुष्काळ पडल्याने सरकार शेतकऱ्यांना 5000 रुपये देणार आहे.
हेही वाचा :
मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश
अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात