सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. (gold and silver) त्यातच आता पुढील काही दिवसात सोन्याचे भाव अधिक घसरण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव घसरत असतानाच अनेकांनी याचा फायदा घेत मोठी गुंतवणूक सोन्यात केली. मात्र, आता खळबळजनक माहिती पुढे येतंय.

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या किंमती सतत बदलताना दिसल्या. सोन्याच्या भावात घसरण झाली. या युद्धाच्या पूर्वी सोन्याचे भाव 2 लाखाच्या आसपास पोहोचले. (gold and silver) पण गेल्या काही दिवसांपासून सोन्यातील घसरण काही कमी होण्याचे नाव घेत नाही. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा 52 लाखांनी खाली आले. PACE 360 चे अमित गोयल यांच्या मते, पुढील काही महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सुधारणा होऊ शकते. पण पुन्हा 2027 मध्ये मोठी घसरण होऊ शकते. पुढेही सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण होऊ शकते. आगामी काळात सोन्यात गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते पुढे काही दिवसात सोन्याच्या भावात चढउतार होऊ शकतात. सोने स्वस्तही होऊ शकते पण त्यानंतर अधिक घसरण होईल. दोन ते तीन महिन्यात पुन्हा सोने आणि चांदीच्या भाव वाढण्याची शक्यता आहे.
अंदाजानुसार, सोन्याची किंमत प्रति औंस 3,900 ते 4,400 डॉलरच्या दरम्यान राहू शकते. चांदीच्या किंमती या औंस 52 ते 60-61 डॉलरदरम्यान व्यवहार करू शकतील. ऑक्टोबर 2027 मध्ये दोन्ही धातूंच्या किंमती या झपाट्याने घसरतील. तीन महिन्यात अमेरिकी शेअर बाजार जर स्थिर राहिला तर सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होईल. भारतात आगामी दिवसात सण आहेत. यादरम्यान सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यंदा भारतीय ग्राहकांनी दिवाळी चांगली जाईल, कारण स्वस्तामध्ये सोने खरेदी करण्याची संधी आहे. पण सोन्यात गुंतवणूक करणे धोकादायक आहे. पुढील दिवसात सोन्याचे दर वाढले असले तरीही किंमती घसरताना दिसतील. 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांवरील यील्ड 7.6 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
सोन्याचे भाव आता घसरताना दिसतील, पण गुंतवणूकदारांनी विचार करूनच सोन्यात गुंतवणूक करावी. (gold and silver) कारण यामुळे मोठा फटका बसू शकतो. इराण आणि अमेरिका युद्धाच्या अगोदर सोन्याचा भाव दोन लाखाच्या आसपास पोहोचला होता. मात्र, आता त्यात मोठी घसरण झाली. यादरम्यानच्या काळात अनेकजण सोन्याच्या भावात गुंतवणूक करत आहेत. मात्र, आगामी काळात सोन्याच्या भावात घसरण अपेक्षित आहे.
हेही वाचा :
मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश
अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात