फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मोठी खांदेपालट सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचं कमबॅक होणार

राज्यातील मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचं कमबॅक होणार असल्याची माहिती आली आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी मंत्र्याचं लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(political) यासाठी एक माजी मंत्री आणि वरिष्ठ मंत्र्याने महायुतीमधील प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. ही भेट रविवारी रात्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीला ग्रीन सिग्नल दिला आहे. या माजी मंत्र्‍यासाठी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी गुरुवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीमुळे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. (political) या नेत्याला सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी देण्याची विनंती स्वत: सुनेत्रा पवार यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

सुनेत्रा पवार यांनी याआधी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. त्यानंतर या कमिटीमधील मंडळींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. (political) त्यानंतर आज सोमवारी सायंकाळी चार वाजता कोअर कमिटीची बैठक होईल. ज्या मंत्र्याचं मंत्रिमंडळात कमबॅक होईल, त्या नेत्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आज देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार देखील नव्हते. ही भेट राष्ट्रवादीला अर्थखाते पुन्हा मिळावे, यासाठी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवी दिल्लीतील या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील या फोटोमध्ये दिसताहेत. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

हेही वाचा : 

नोव्हेंबरमध्ये बँका एकूण 17 दिवस बंद असणार, महाराष्ट्रात किती दिवस

लेक लाडकी योजनेच्या नियमात मोठा बदल, आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता थेट

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेणार : पालकमंत्री