दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाचा शिवाजी पार्कवरील दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या बांधवांना दुष्काळाने ग्रासले असताना उत्सव साजरा करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यंदा उत्साहावर नियंत्रण ठेवून फराळ व कंदील लावण्याचे आवाहन त्यांनी केले, तर फटाके व रोषणाई टाळण्याचे म्हटले आहे.

उद्यापासून राज्यात दिवाळी साजरी होत आहे. दिवाळी निमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत. लोक खरेदी विक्री करताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात भयानक दुष्काळ पडला आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी शिवाजी पार्कात होणारा मनसेचा दीपोत्सव यंदा होणार नाही, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर एक व्हिडीओ ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपले बांधव दुष्काळाने होरपळत असताना दीपोत्सव साजरा करणं मनाला पटत नाही, (Raj Thackeray) अशा भावनाही राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. राज यांच्या या निर्णयामुळे यंदाचा शिवाजी पार्कातील मनसेचा दीपोत्सव होणार नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यातून त्यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी दीपोत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने शिवाजी पार्कात प्रचंड उत्साह असतो. रोषणाई केलेली असते. फटाक्यांची आतषबाजी असते. ही आतषबाजी पाहण्यासाठी मुंबई-ठाण्यासह राज्यभरातून लोक येता आणि त्याचा आनंद लुटतात. सर्वजण मजा करत असतात. परंतु या वर्षीचा दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Raj Thackeray) याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात असलेला, येऊ घातलेला भयानक दुष्काळ आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असा उत्सव साजरा व्हावा हे मनाला पटलं नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.आज महाराष्ट्र एका विचित्र अवस्थेतून जात आहे. राज्यातील ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळ भयानक आहे. या परिस्थितीत आपण ज्या उत्साहात दिवाळी साजरी केली तर राज्यातील आपले बांधव, भगिनींना काय वाटेल? त्यांच्या कच्चाबच्च्यांना काय वाटेल? या गोष्टींचा आपणच विचार केला पाहिजे, असं राज यांनी म्हटलं आहे.

1972 पेक्षाही यंदा भयानक दुष्काळ असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी हे आधी जाहीर करूनही सत्ताधारी पक्षातील लोकांना ते कळलं नाही. ते गरबा खेळत बसले. तो त्यांचा प्रश्न आहे. पण अशा प्रकारचा दीपोत्सव साजरा करणं मनाला पटत नाही. (Raj Thackeray) त्यामुळे या वर्षी दीपोत्सव साजरा करायचा नाही. पुढच्या वर्षी सर्व ठिकठाक होईल ही आशा आहे. राज्यातून तांडेच्या तांडे बाहेर पडतील ते शहरात येतील. शहराची परिस्थिती आपण पाहत आहोत. मी तुम्हाला विनंती करतो, आपल्याला काळी दिवाळी साजरी करायची नाही. पण उत्साहाला आवर घालणं आवश्यक आहे. फटाके फोडताना आवर घाला. आपण महाराष्ट्रातील नागरिक आहोत. महाराष्ट्रावर आपलं प्रेम आहे. आपले लोक होरपळत असताना अशा पद्धतीने उत्सव करणं पटत नाही. अर्थात कंदिल लावा. फराळ वाटा. पण रोषणाई करणं, फटाके फोडणं या गोष्टींना आवर घाला. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपण जोरात हा दीपोत्सव साजरा करूया, असंही ते म्हणाले.

हेही वाचा : 

स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम

कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड

मोठी बातमी शरद पवार रुग्णालयात दाखल, अचानक तब्येत बिघडली