ऊसाला पहिली उचल साडेचार हजार रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. (Shetkari) गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन पेटले आहे. साताऱ्यातील पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तब्बल २२ तासपासून ठप्प आहे. वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागल्या आहेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला पहिली उचल प्रतिटन साडेचार हजार रुपये मिळावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमधील किणी टोलनाका रोखून धरला असतानाच त्यांच्या आदेशानुसार साताऱ्यातील नागठाणे येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. (Shetkari) गेल्या २२ तासापासून स्वाभिमानीचे तीव्र आंदोलन सुरू आहे. महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर काही ट्रक चालकांनी त्यांना मारहाण झाल्याचाही आरोप केला आहे.
सरकारने साखरेची एमएसपी ५० रुपये करावी आणि इथेनॉलच्या दरात १२ रुपयांची वाढ करून तो ७० रुपये करावा. राज्य सहकारी बँकेने साखरेचे मूल्य प्रति क्विंटल ४ हजार २०० रुपये केले असतानाही सर्वपक्षीय कारखानदार एकजूट करून शेतकऱ्यांना उचल देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार यांनी केला आहे. जोपर्यंत कोल्हापूरमधील आंदोलनावर तोडगा निघत नाही आणि राजू शेट्टींचा पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत महामार्गावरून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
वाहनांच्या लांबच लांब रांगा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे गावच्या हद्दीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर चक्का जाम आंदोलन केल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ऊसाला पहिली उचल चार हजार पाचशे रुपये मिळावी ही प्रमुख मागणी सह इतर मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक रस्त्यावर बसलेले पाहायला मिळत आहेत.
मुंबईला जाणारा भाजीपाला-दूध रोखणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. गेल्या २२ तासांपासून पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला आहे. या महामार्गावरील किनी टोल नाका येथे राजू शेट्टी यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे. आजपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. आज तोडगा निघाला नाही तर मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि दूध रोखण्याचा ही शेट्टी यांनी इशारा दिला आहे.
स्वाभिमानीचा फायनान्स कंपनीला दणका अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेत स्वाभिमानीचा फायनान्स कंपनीला दणका दिला आहे. कांबळे परिवाराच्या घराचे सील तोडले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोरा बोडखा येथील घटना आहे. (Shetkari) एका फायनान्स कंपनीने कांबळे परिवाराच्या घराला सील ठोकले होते. रवी कांबळे आणि राजकुमार कांबळे यांच्या कुटुंबाचा घरात प्रवेश रोखल्याचा आरोप होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांच्या नेतृत्वात आंदोलन करून हातोडा मारून घराचे सील तोडण्यात आले.
हेही वाचा :
स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम
कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड