धनत्रयोदशीला संध्याकाळी करा मिठाचे हे 3 उपाय, चमकू शकते नशीब, घरातून दूर होईल गरिबी

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी आणि भांडी खरेदी करण्यासोबतच मिठाची खरेदी करणेही शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिवशी मिठाशी संबंधित तीन सोपे उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास आणि सुख-समृद्धी येण्यास मदत होते.

धनत्रयोदशीचा सण सुख-समृद्धी आणि भरभराटीची कामना करत साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा केली जाते. (Dhanteras) तसेच घराची स्वच्छता करून नवीन वस्तू खरेदी करण्याचीही परंपरा आहे. सोने, चांदी आणि भांडी, झाडू खरेदी करण्यासोबतच या दिवशी मीठ खरेदी करणेही शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, मिठाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मिठाशी संबंधित कोणते तीन उपाय करता येतात, जाणून घेऊया. मुख्य दरवाजाजवळ मिठाचे पाणी शिंपडा वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशाचे ठिकाण मानला जातो. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य दरवाजाची स्वच्छता करण्याला विशेष महत्त्व आहे. यासाठी थोड्याशा पाण्यात मीठ मिसळून घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ शिंपडावे. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते, अशी धार्मिक मान्यता आहे. मिठाच्या पाण्याने घर पुसा धनत्रयोदशीच्या दिवशी घराची स्वच्छता करणे शुभ मानले जाते. (Dhanteras) या दिवशी लक्ष्मीपूजनापूर्वी पाण्यात थोडे मीठ मिसळून घर पुसावे. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. घरातील कोपरे, खोल्या आणि ज्या ठिकाणी धूळ साचली आहे, अशा जागांचीही व्यवस्थित स्वच्छता करावी. मीठ खरेदी करा धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोने, चांदी, भांडी, झाडू यांसोबतच मीठ खरेदी करणेही शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, मीठ हे समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते. (Dhanteras) त्यामुळे धनत्रयोदशीच्या संध्याकाळी आपल्या गरजेनुसार थोडे मीठ खरेदी करून घरी आणू शकता. या परंपरेमागे घरात सुख-समृद्धी नांदावी आणि धनधान्याची कमतरता भासू नये, अशी भावना आहे. मिठाशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवा धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ उधार घेऊ नये किंवा कोणाला उधार देऊ नये, अशीही काही ठिकाणी धार्मिक मान्यता आहे. मिठाला समृद्धीशी जोडले जात असल्याने ही परंपरा पाळली जाते. तसेच घरातील मिठाचा डबा रिकामा राहू देऊ नये, अशीही काही कुटुंबांमध्ये प्रथा आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले

निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा