मोठी बातमी कर्मभूमी एक्स्प्रेसच्या ४ डब्यांना भीषण आग प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं

पंजाबमधील पटियाला येथील राजपुरा परिसरात कर्मभूमी एक्स्प्रेसच्या चार डब्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली. ट्रेन सुरू असतानाच अचानक आग लागल्याने डब्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला. (Karmabhoomi) मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन अमृतसरहून बिहारच्या दिशेने जात होती.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनच्या पँट्री कारमधून आगीला सुरुवात झाली. दिवाळीचा सण असल्याने ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. (Karmabhoomi) त्यामुळे आग लागल्याचं समजताच प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

अमृतसरहून येणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला वसंतपुरा रेल्वे स्थानकाच्या सुमारे १० ते १२ किलोमीटर आधी आग लागली. ट्रेन सुरू असतानाच चार डब्यांमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. हे लक्षात येताच प्रवाशांनी प्रसंगावधान राखून तातडीने चेन पुलिंग केली. त्यामुळे ट्रेन थांबली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडण्याची संधी मिळाली. आगीमुळे डब्यांमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनच्या पँट्री कारमध्ये सर्वप्रथम आग लागली. (Karmabhoomi) त्यानंतर ही आग इतर डब्यांपर्यंत पसरली. पंजाबचे उपायुक्त हिमांशू यांनीही याबाबत माहिती दिली. ट्रेनच्या काही डब्यांना आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राथमिक तपासात पँट्री कारमधून आगीला सुरुवात झाल्याचं समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दलाचे (आरपीएफ) वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आसपासच्या परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने आग विझवण्यात आली. सुरुवातीला काही प्रवासी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नंतर कोणालाही दुखापत झाली नसल्याचं स्पष्ट झालं.

या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आगीमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी सर्व शक्य बाबींची तपासणी केली जाणार आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत घडलेल्या या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. चौकशीतून आगीचं नेमकं कारण आणि नुकसानीचा तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले

निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा