उसाला प्रति टन ४५०० रुपये दर मिळावा या मागणीसाठी किणी टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन अखेर काल रात्री दोन वाजता संपुष्टात आले. प्रतिटन ४२०० रुपये दराचा प्रस्ताव संघटनेला मान्य झाल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरातील आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आणि त्यानंतर तब्बल ६२ तासांनंतर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग पूर्ववत झाला. ऐन दिवाळीत प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून या महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने हजारो प्रवासी, वाहनचालक, दूध उत्पादक, व्यापारी आणि एसटी महामंडळ यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.पर्यायी मार्गही बंद पडल्याने संपूर्ण कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. (Shetkari) मात्र मध्यरात्री झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रशासन, साखर कारखानदार प्रतिनिधी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये ४२०० रुपये प्रति टन दरावर सहमती झाली आणि या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळीच शेतकऱ्यांसमोर आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरील अडथळे दूर केले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलली. आणि पहाटेपर्यंत महामार्गावरील वाहनांची कोंडी फुटून वाहतूक पूर्वपदावर आली. या निर्णयानंतर शेतकऱ्यांतून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला असून आंदोलकांनी एकमेकांना पेढे भरवून घोषणाबाजी करत आणि फटाके फोडून या यशाचे स्वागत केले.
सुरुवातीला कारखानदारांकडून ४५०० रुपये दर देण्यास नकार देण्यात आला होता. प्रशासनाकडूनही चर्चेसाठी कोणी पुढे येत नव्हते. (Shetkari) मात्र सलग तीन दिवसांच्या तीव्र आंदोलनानंतर आणि कोल्हापूर, सांगली, सातारा बंदच्या हाकेनंतर सरकारला आणि कारखानदारांना नमते घ्यावे लागले आणि ४२०० रुपयांवर तोडगा निघाला. स्वाभिमानीची मूळ मागणी ४५०० रुपयांची असली तरी सध्याच्या परिस्थितीत ४२०० रुपये दर हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
यापुढेही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला. दरम्यान महामार्ग मोकळा झाल्याने दिवाळीसाठी घरी परतणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. एसटी महामंडळानेही रद्द केलेल्या फेऱ्या पुन्हा सुरू केल्या आहेत. दूध, भाजीपाला, पेट्रोल-डिझेल यांचा पुरवठाही आता सुरळीत होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा अखेर ६१ तासांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर सुटला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन स्थगित केले आहे. (Shetkari) चर्चेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ३९०० रुपये अधिक हंगाम समाप्ती नंतर १०० रुपये आणि साखरेला प्रति क्विंटल सलग पणे ४५०० रुपये पेक्षा अधिक दर मिळाला तर आणखी उसाला आणखी २०० रुपयांचा असा एकूण ४२०० रुपयांचा नवा फॉर्म्युला मंजूर करण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ४,५०० रुपयांच्या मूळ मागणीवरून माघार घेत शेतकऱ्यांच्या हितासाठी या तडजोडीच्या फॉर्म्युलाला मंजुरी दिली. यामुळे पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाका येथे सुरू असलेले ‘चक्काजाम’ आंदोलन मागे घेण्यात आले. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट
दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले
निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा