विकायला ठेवलेल्या पणत्यांवर चालवली कार व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

रस्त्याच्या कडेला दिवे विकायला बसलेल्या एका महिलेच्या पणत्यांवरून थेट कार गेली. (lamps) त्यामुळे त्या पणत्यांचा चक्काचूर झाला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकरी संताप व्यक्त करत आहे.

दिवाळी जवळ आली की रस्त्याच्या कडेला पणत्या विकणारे छोटे विक्रेते दिसू लागतात. चार पैसे मिळतील या आशेने ते दिवसभर रस्त्यावर बसून पणत्या विकत असतात. अशाच रस्त्याच्या कडेला पणत्या विकायला बसलेल्या महिलेच्या त्या मातीच्या पणत्यावरून गाडी गेल्याचा व्हिडिओ समोर आला. (lamps) काही क्षणातचं तिच्या त्या पणत्यांची माती झाली. हा व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्याच्या कडेला बसून मातीच्या पणत्या विकताना दिसते. तिच्यासोबत एक लहान मूलही आहे. कागदावर पणत्या विकण्यासाठी पसरवलेल्या होत्या. त्याचवेळी तिथे एक मोठी कार येते आणि कारचं चाक पणत्यांवरून जातं. त्यामुळे महिलेने विक्रीसाठी ठेवलेल्या त्या पणत्यांची माती होते.

ती महिला आणि त्या मूलाच्या डोळ्यासमोर हे सगळं घडत होतं. पण गरीब असल्याने त्यांच्यात काही करण्याची हिंमत नव्हती. त्यानंतर काही लोक तिथे जमा होतात. उरलेल्या पणत्या गोळा करून एका पोत्यात भरताना दिसतात. महिलेच्या चेहऱ्यावरची निराशा पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यामध्ये संतापाची लाट उसळत आहे. वाहन चालवताना आजूबाजूला असलेल्या गोष्टींचे भान ठेवावे असे नेटकरी सांगत आहेत. एखाद्या गरीबाच्या रोजी रोटीचे नुकसान करू नये. असेही मत व्यक्त केले जात आहे. तर काही यूजर्सच्या मते हा व्हिडिओ रील साठी तयार करण्यात आला आहे असे म्हणणे आहे. काही नेटकऱ्यांनी अशा प्रकारे गरीबीचे प्रदर्शन करून व्हूज मिळवण्यावरही नाराजी व्यक्त केली आहे.

या व्हिडिओबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटना नेमकी कुठे घडली आणि कधी घडली. याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (lamps) तसेच कार चालकाने जाणूनबूजून पणत्यांवरून गाडी नेली की हा प्रकार अपघाताने घडला याचीही स्वतंत्र माहिती समोर आलेली नाही. काही रूपयांसाठी दिवसभर मेहनत करणाऱ्या अशा विक्रेत्यांसाठी त्यांच्या पणत्या म्हणजे केवळ मातीचे दिवे नसतात, तर त्यांच्या घरच्या दिवाळीची आशा असते.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले

निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा