लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (deposited)लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचे १५०० रुपये लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचे समोर आले आहे. याच निधीमधून मे महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच महिलांना पैसे येऊ शकतात.लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला आहे. आदिवासी विकास खात्याचे तब्बल ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करण्यात आला आहे.

महिला व बालविकास खात्याकडे हा निधी दिला असल्याचे वृत्त समोर आले आहे.यामुळे येत्या काही दिवसांत १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. (deposited)तसेच मे महिना संपायला अवघे ६ दिवस उरले आहेत. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं बोललं जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत जर महिलांना मे महिनाअखेरपर्यंत पैसे मिळाले नाही तर कदाचित मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो. महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील. परंतु या आठवड्याच्या शेवटपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. महिलांना पैसे कधी येणार याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे माहिती देतील. आदिती तटकरे स्वतः ट्विट करुन १५०० रुपये कधी येणार याबाबत माहिती देतात. (deposited) ही अधिकृत माहिती आल्यावरच नक्की मे महिन्याचा हप्ता कधी येणार यावर विश्वास ठेवा.
हेही वाचा :
वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील
हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता