रेशनकार्ड विभक्त केल्यावर धान्य बंद झालं, पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावं

रेशनकार्ड हा सर्वांसाठीच महत्त्वाचा पुरावा आहे. ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न कमी असतं, त्यांना रोजसाठी लागणारे धान्य कमी पैशात मिळावं यासाठी रेशनकार्ड असणं आवश्यक असतं. जर रेशनकार्डावरच्या काही सदस्यांचा पत्ता बदलला किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल (Ration card) तर अनेकजण रेशनकार्ड विभक्त करतात. पण रेशनकार्ड विभक्त केल्यानंतर जुन्या कार्डावरचं धान्य बंद होतं. एवढंच नाही, तर नवीन रेशनकार्ड मिळाल्यानंतरही अनेकांना धान्य सुरू होण्यासाठी अडचणी येतायेत. आता अशा लाभार्थ्यांना धान्य परत सुरू करण्यासाठी तहसीलदारांकडून मिळणारा उत्पन्नाचा दाखला जोडणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

रेशनधान्य सुरू करण्यासाठी उत्पन्नाची अट काय नवीन रेशनकार्ड काढायचं असेल किंवा बंद झालेलं रेशनधान्य परत सुरू करायचं असेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तपासलं जाईल. ग्रामीण भागातल्या रेशनकार्डधारकांचं वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपयांपर्यंत असणं आवश्यक आहे. तर शहरी भागातल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न ५९ हजार रुपयांच्या आत असायला हवं. अंत्योदय रेशनकार्ड मिळवण्यासाठी वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. (Ration card) त्यामुळे नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करताना तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा लागेल. उत्पन्नाच्या मदतीने संबंधित कुटुंबाला अंत्योदय की प्राधान्यक्रम कुटुंब यापैकी कोणतं रेशनकार्ड द्यायचं, हे ठरवलं जाईल.

हजारो लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद केंद्र सरकारच्या ‘मिशन सुधार’ अंतर्गत शहरातील ५३ हजार आणि ग्रामीण भागातील ४४ हजार लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद झालं आहे. यातल्या ३५ हजार लाभार्थ्यांनी तीन ते सहा महिने धान्य घेतलं नाही, तर त्यांचं रेशनधान्य आपोआप बंद करण्यात आलंय. (Ration card) तसेच उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांचीही तपासणी केली जातेय आहे. नवीन रेशनकार्ड ३० दिवसांत मिळणार रेशनकार्ड विभक्त करणं किंवा नवीन रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. यासाठी महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल.

१. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
२. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड
३. रहिवासी पुरावा
४. तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला
५. विभक्त रेशनकार्डासाठी जुने रेशनकार्ड

ही सर्व कागदपत्र ऑनलाइन अपलोड करून अर्ज केल्यानंतर साधारण ३० दिवसांत नवीन रेशनकार्ड मिळू शकते. त्यामुळे रेशनकार्ड विभक्त करणाऱ्या किंवा ज्यांचे धान्य बंद झाले आहे, अशा लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : 

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधीपासून सुरू होणार परीक्षा

शरद पवारांना सुनेत्रा पवार भेटल्याच नाहीत, तीन वेळा वेळ घेतला, पण तर्कवितर्कांना उधाण

इचलकरंजीतील राजाराम स्टेडीयमचे रूपडे पालटणार आधुनिकीकरणासाठी ५ कोटी मंजूर