लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दरमहिन्याला मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता मिळणाऱ्या या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे लाखो महिलांचं लक्ष हप्त्याकडे लागलं आहे.

राज्यातल्या काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. (Ladki Bahin Yojana) त्यामुळे इतर योजनांच्या निधीचंही नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडल्याचं सांगितलं जात आहे.

२८ नोव्हेंबरपर्यंत पैसे न आल्यास ₹3,000 मिळणार जर लाभार्थी महिलांच्या खात्यात २८ नोव्हेंबरपर्यंत ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला नाही, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. आजच्या Cabinet Meeting मध्ये हप्त्याच्या निधीबद्दल काही निर्णय होतो का, याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. (Ladki Bahin Yojana) पण ३००० रुपये एकत्र मिळबाबत सरकारकडून अजून अधिकृत आदेश आलेले नाहीत.

लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रोसेस १६ नोव्हेंबरपासून अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. पण पहिल्याच दिवशी महिलांना Technical Issues ला सामोरं जावं लागलं होतं. आधार क्रमांक टाकल्यानंतर बऱ्याच महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. (Ladki Bahin Yojana) एकाच वेळी मोठ्या संख्येने महिलांनी लॉगिन केल्यामुळे Server वर जास्त लोड आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रशासनाने वेबसाइटवरचा तांत्रिक समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, मनसेत मोठा पक्षप्रवेश, मुंबईत घडामोडींना वेग

अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हुपरीमध्ये आगीत तीन घरे भस्मसात