कुस्ती जिंकली कुस्ती हरली

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

विविध क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करायला भारत सरकारकडून जेव्हा सुरुवात झाली तेव्हा क्रीडा क्षेत्रातील पहिला पद्म पुरस्कार ऑलिंपिक वीर पैलवान खाशाबा जाधव यांना देऊन सन्मानित करायला हवे होते. (contributions) पण देशाला केळसंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीमध्ये 52 किलो वजन गटात पहिले पदक मिळवून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी त्यांच्या वारसांना आणि चाहत्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागते हे दुर्दैव आहे. मराठीच्या मुद्द्यावर आपला राजकीय अजेंडा राबवणाऱ्या नेत्यांना यासाठी एकदाही आवाज उठवावा असे वाटले नाही हे त्यापेक्षाही अधिक दुर्दैव म्हणावे लागेल.

खाशाबा जाधव यांनी इसवी सन 1952 मध्ये भारताला कुस्तीमध्ये व्यक्तिगत गटात ऑलिंपिक पदक मिळवून दिले आणि पद्म पुरस्कार देण्याची परंपरा इसवी सन 1954 मध्ये सुरू करण्यात आली. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न अशी या सर्वोच्च नागरी पुरस्कारांना नावे देण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते. विविध क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. वास्तविक 1954 मध्येच खाशाबा जाधव यांना ते हयात असताना पद्म पुरस्काराने सन्मानित करायला हवे होते, प्रत्यक्षात मात्र त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. खाशाबा जाधव यांच्या वारसांची त्यांच्या गावी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षांपूर्वी भेट घेतली. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची गांभीर्याने दखल घेतली. आणि खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी अर्थात जयंती निमित्त राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रीडा दिन साजरा केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली होती प्रत्यक्षात मात्र त्यांच्या जयंतीदिनी क्रीडा दिन साजरा केला गेला नाही.

ऑलिंपिक, राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धा गाजवणाऱ्या क्रीडापटूंना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. करोडो रुपयांची बक्षिसे जाहीर केली जातात. त्यांना नोकरीत प्राधान्य दिले जाते. द्वितीय श्रेणीतील अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते. (contributions) अशाप्रकारे आजच्या क्रीडापटूंना प्रोत्साहित केले जाते. पण असा सन्मान देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांना मिळालेला नाही. सैफ अली खान हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक कलाकार. त्याच्या चित्रपटांना किंवा त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे ऐकिवात नाही. पण तरीही इसवी सन 2010 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्याच्यानंतर नाना पाटेकर आणि अगदी काही महिन्यापूर्वी अशोक सराफ यांना पद्म पुरस्कार दिला गेला आहे. एकूणच मराठी माणसाची पद्म पुरस्कारासाठी विलंबानेच दखल घेतली जाते.

एखादी व्यक्ती मृत झाली की, तिला पद्म पुरस्कार देता येणार नाही अशी केंद्र शासनाची भूमिका होती. मात्र अंबानी उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांना त्यांच्या मृत्यूनंतर 14 वर्षानंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे, तर मग ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांनाही पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी रणजीत खाशाबा जाधव तसेच खाशाबा जाधव यांच्या चाहत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. (contributions) न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती शैलेश पी ब्रम्हे यांच्या खंडपीठाने या संदर्भात दिलेला निर्णय दिलासा जनक आहे.

राज्य शासनाने पैलवान खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी संबंधित समितीकडे शिफारस करावी आणि या समितीने खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याचा विचार करावा असे खंडपीठाने सुचित केले आहे. पद्म पुरस्कार निवडीसाठी कोणताही कठोर निकष नसून व्यक्तीचे अभूतपूर्व योगदान विचारात घेतले जाते असे मत व्यक्त करत खंडपीठाने केंद्राचा 30 एप्रिल 2026 चा पत्रव्यवहार नियमांशी विसंगत ठरवून अमान्य केला आहे. पुरस्कार देण्याचे थेट आदेश न्यायालय देऊ शकत नाही तथापि राज्य शासनाने 4 ऑगस्ट 2026 रोजी पाठवलेली शिफारस आणि सर्व कागदपत्रे विचारात घेऊन केंद्रीय ग्रह मंत्रालयामार्फत पद्म पुरस्कार समितीने योग्य निर्णय घ्यावा असे न्यायालयाने म्हटले आहे.

वास्तविक पुरस्कार जाहीर करावा यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागते हे चित्रच कमालीचे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्ष मराठी आणि मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण करत असतात. तथापि खाशाबा जाधव यांच्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत ऑलिंपिक मध्ये कास्यपदक मिळवणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी मराठी नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक होते, पण दुर्दैवाने त्यांच्याकडून हे घडलेले नाही.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं