अक्वान चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर झाला नसल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीने चांगलाच जोर धरला आहे. (Maharashtra) यामुळे तामपाना मोठी घसरण पहायला मिळत आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.३ अंश तर निफाड येथे ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २१) राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकून जमिनीवर आले असून, या प्रणालीची तीव्रता वेगाने कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तरेकडील थंड हवा येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला असून, राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. दिवसाच्या कमाल तापमानात घट झाली आहे. पुढचे ५ दिवस तापमानात अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानाचा पारा घसरल्याने शुक्रवारी (ता. २०) धुळे आणि निफाड येथे थंडीची लाट आली. (Maharashtra)त्यापाठोपाठ जळगाव येथे ८ अंश सेल्सिअस, नाशिक आणि यवतमाळ येथे प्रत्येकी १० अंश, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १०.१ अंश, तसेच पुण्यात ११.३ आणि जेऊर येथे १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने हुडहुडी वाढली. राज्यात बहुतांश ठिकाणी पारा १५ अंशांच्या खाली घसरला आहे.
राज्याच्या कमाल तापमानात देखील घट होऊ लागली असून, शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली घसरला आहे. आज (ता. २१) अक्वान चक्रीवादळाच्या अवशेषामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra) यातच किमान तापमानातील घट कायम राहून गारठा कायम राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरातील ‘अक्वान’ चक्रीवादळ शुक्रवारी (ता. २०) सकाळी ओडिशातील गोपाळपूरजवळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्याला धडकले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या वादळाची तीव्रता कमी होऊन ही प्रणाली ओसरणार आहे. या वादळामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशात जोरदार पाऊस कोसळत असून, पूर्व विदर्भात ढगाळ हवामान झाले होते.
हेही वाचा :
दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं