मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरूनच माझ्यावर हल्ला, रेखा कोंडे यांचा गंभीर आरोप, थेट मोठा राडा

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रेखा कोंडे यांना बेदम मारहाण झाली. या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. (beating) रेखा कोंडे यांनी संबंधित महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला.

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रेखा कोंडे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ पुढे आला आहे. केस ओढून त्यांना ही मारहाण झाली. या प्रकरणात आता मोठी अपडेट पुढे येत आहे. (beating) याप्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरती मारणे, त्यांच्या आई, मुलगी आणि पुनम दाभेकर असं एकूण चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रेखा कोंडे यांना सर्वांनी मिळून जोरदार मारहाण केली. बेदम मारहाण रेखा कोंडे यांना झाली. रेखा कोंडे यांनी या हल्ल्यानंतर गंभीर आरोप केली. थेट मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरच त्यांनी आरोप केला. रेखा कोंडे यांनी म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांनी जरांगे

आरती मारणे ही मनोज जरांगे पाटील यांची समर्थक आहे. मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून माझ्यावर हा हल्ला झाला. मात्र, मी मनोज जरांगे पाटील यांच्या खेळीला जशास तसे उत्तर देणार असल्याचे मोठे विधान रेखा कोंडे यांनी केले. मी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत असल्यामुळे माझ्यावर हल्ला करण्यात आला, असेही त्यांनी म्हटले.मी यापुढे देखील माझी लढाई अशीच सुरू ठेवणार आहे. ठाकरे गटाकडून कारवाई संदर्भात मला कुठलाही फोन अद्याप आला नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिप नंतर पुढे काय झालं?,असाहा मोठा प्रश्न यावेळी रेखा कोंडे यांनी उपस्थित केला. (beating) मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्याविरोधात रेखा कोंडे बोलताना दिसत आहेत. जरांगे यांच्या सांगण्यावरून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप रेखा कोंडे यांनी केला. पोलिस या प्रकरणात तपास करत असून गुन्हे दाखल करण्यात आली. मात्र, रेखा कोंडे यांना ज्यापद्धतीने मारहाण झाली, त्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. सोशल मीडियावर या मारहाणीचे व्हिडीओही व्हायरल झालीत. यावर आता ठाकरे गट काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं