गौप्यस्फोट केलाच आहे तर त्या दोघांची नावेही सांगून टाका!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बाईच्या पोटातलं, जिभेवरचा तीळ भिजण्याआधीच ओठावर येतं असं म्हणतात तर राजकारणी(politics) लोकांच्या पोटातलं त्यांना गरज वाटेल तेव्हाच ओठावर येतं. पहाटेच्या शपथविधीचं रहस्य बऱ्याच महिन्यांनी काही जणांनी सांगितलं. त्यावर खुलासे आणि प्रती खुलासे झाले. तो विषय मागे पडला आहे. आता आठ महिन्यापूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर आधी राहुल गांधी यांनी “मत चोरी” झाल्याचा आरोप केला आहे आणि पाठोपाठ शरद पवार यांनीही निवडणूक रहस्याच्या चौकटीत नेऊन ठेवली आहे.

आपण नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे सामान्य जनतेच्या समोर येण्यासाठी चौकशीची गरज आहे पण ही चौकशी कोण करणार आणि चौकशीचे आदेश कोण कुणाला देणार? दोन-तीन दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्र कर्नाटकात मतांची चोरी कशी झाली आहे आणि होते आहे याचे काही कागदपत्रांच्या आधारे एका स्क्रीनवर प्रेझेंटेशन केले होते.

त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजेत आणि ती देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर येते आहे. आम्ही चौकशी करतो पण”आम्ही दिलेली माहिती सत्य आहे”याबद्दल शपथ पत्र द्या असे आयोगाने त्यांना आवाहन केले आहे पण त्याला प्रतिसाद न देता मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे त्यामुळे याप्रकरणी शपथपत्र देण्याची गरज नाही. अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. या देशातील नागरिकांना अनेक कारणांसाठी तितकेच काय जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी सुद्धा शपथ पत्र द्यावे लागते तर मग राहुल गांधी यांना असे शपथपत्र देण्यात कोणती अडचण आहे?

शपथपत्र दिले आणि त्या नंतर निवडणूक(politics) आयोगाने चौकशी करण्याचे आश्वासन दिले तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. नुसतेच आरोप करायचे आणि त्याबद्दल संवैधानिक यंत्रणेकडे लेखी तक्रार करायची नाही ही भूमिका बरोबर नाही. संसदेमध्ये संविधानाची शपथ घेतली आहे म्हणून मग इतर कोणत्याही गोष्टीत शपथपत्र द्यायची गरज नाही अशी भूमिका घेण्यामागे राहुल गांधी यांचा हेतू काय आहे हे समजत नाही. सर्वसामान्य जनतेला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. राहुल गांधी यांनी तसेच शपथपत्र दिले तर त्यावर आपली भूमिका कोणती असणार आहे हे सुद्धा निवडणूक आयोगाने स्पष्ट करणे आवश्यक आहे.

राहुल गांधी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही”विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान नवी दिल्ली येथे माझ्या निवासस्थानी दोन व्यक्ती आल्या होत्या आणि त्यांनी 288 पैकी 160 जागा तुम्हाला जिंकून देतो असे मला सांगितले होते. त्या दोघांना मी राहुल गांधी यांच्याकडे पाठवले होते. पण असे काही करण्यात ऐवजी जनतेच्या न्यायालयातच आपण जाऊ असा विचार आम्ही केला असे मीडियाला सांगितले आहे. सुरक्षा व्यवस्था भेदून किंवा आधी अपॉइंटमेंट घेऊन त्या दोन व्यक्ती शरद पवार यांना भेटल्या असतील तर त्या दोघांची नावे त्यांना नक्की माहित आहेत असा त्याचा अर्थ होतो. शरद पवार यांच्यानंतर उबाठा शिवसेनेचे संजय राऊत यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केलेले आहे.

त्या दोन व्यक्ती महायुतीच्या प्रमुख नेत्यांना(politics) भेटल्या, त्या दोघांच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला फार मोठे यश मिळाले असे या दोघांनाही अप्रत्यक्षपणे सांगावयाचे आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने ही निवडणूक ईव्हीएम घोटाळा करून जिंकलेली आहे असा पहिल्यांदा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. महाविकास आघाडीचे नेतेही तसेच बोलू लागले होते. त्यांच्याकडून ईव्हीएम सरकार असा उल्लेख महायुती बद्दल केला जात होता.

नंतर हीच मंडळी लाडकी बहीण योजनेमुळे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. या योजनेचा आम्हाला फटका बसला असे बोलू लागली. लोकसभा निवडणुकीचे प्रतिबिंब विधानसभेच्या निवडणुकीवर पडेल या फाजील आत्मविश्वासात आम्ही होतो
आणि तो आम्हाला नडला असेही सांगितले गेले.

चारच दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी”विधानसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपात दिरंगाई झाली. अनेक बैठका घ्याव्या लागल्या. अखेरच्या क्षणापर्यंत वाटाघाटीचा घोळ होता. निर्णय घेण्यात विलंब होत गेल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम निवडणुकीत दिसून आला आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचा पराभव झाला” असे सांगितले आहे.

पराभव नेमका कशामुळे झाला याची अनेक कारणे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडून या आधीच सांगितली गेली आहेत आणि आता मात्र विधानसभेची(politics) निवडणूक प्रक्रियाच या मंडळींनी संशयाच्या आणि रहस्याच्या चौकटीत नेऊन ठेवली आहे.
288 पैकी 160 जागा आम्ही जिंकून देऊ शकतो असे ठामपणाने सांगणाऱ्या त्या दोघांच्या विरुद्ध खरे तर या मंडळींनी पोलिसात फिर्याद देणे आवश्यक आहे. त्या अज्ञात दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अनेक गोष्टी बाहेर येतील. त्या दोघांच्याकडे निवडणूक जिंकण्याचे नेमके कोणते तंत्र आहे हे महाराष्ट्राला समजून येईल.

हेही वाचा :

भाजपच्या गळाला सांगलीतील बडा नेता? चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

“१५ ऑगस्टला मटण पार्टीचा इशारा; आव्हाडांचा शिंदेंना थेट सवाल”

“अभिनेता सुयश टिळकचा अपघात; मदत न मिळाल्याने वाढली चिंता”