ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हूक तुटून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण ठार झाले. महादेव दिनकर करवळ (वय ४९, रा. सोनारवाडी, ता. भुदरगड) व बचाराम शिवाजी सुतार (६५, रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत. (accident) दोघेही संताजी घोरपडे साखर कारखान्याचे कर्मचारी होते. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धामणे (ता. आजरा) गावाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रॉलीही शेजारील शेतात उलटली. घटनेनंतर चालक पळून गेला.

उसाची वाहतूक करणारे काही ट्रॅक्टर ट्रॉलीच्या क्षमतेपेक्षा अधिक भरले जातात. चढणीला ट्रॅक्टरची पुढची दोन चाके हवेत उचलतात. ट्रॅक्टर खाली पडताच हूक तुटतो. (accident) यावेळी ट्रॉलीमागे येताना पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे. उत्तूर येथील अपघातीत अशाच पद्धतीने झाल्याचा अंदाज आहे.
याबाबतची हकिकत अशी, हा ट्रॅक्टर ट्राॅलीच्या डब्यात तुकडे केलेला ऊस भरून कारखान्याकडे चालला होता. (accident) त्याच्या पाठोपाठ करवळ हे दुचाकीवरून रात्रीच्या ड्युटीसाठी कारखान्याकडे चालले होते. सुतार त्यांच्या मागे बसले होते. धामणे गावाजवळ बेलटेकी येथील विद्युत डिपीजवळ ट्रॅक्टर आल्यावर ट्राॅलीचा हूक तुटला. यामुळे ट्रॉली वेगाने पाठीमागे आली व त्यांच्या दुचाकीला जोरात धडकली. यात करवळ व सुतार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रॉलीही शेजारील शेतात उलटली. घटनेनंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला. याबाबत संदीप नारायण पोवार यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा :
दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं