देशाच्या सर्वात मोठी पॅकबंद पाण्याचा ब्रँड Bisleriचे नमूने तपासणीत पिण्यालायक नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता FSSAI ने कंपनीच्या विरोधात कोर्टात केस चालवण्यास मंजूरी दिली आहे.
बाटलीबंद पाणी आपण डोळेबंद करुन बिनधास्त पित असतो. मात्र, आता एक धक्कादायक घटना घडली आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध बिसलेरी कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. खाद्य पदार्थांचे सुरक्षा पाहणारी सरकारी संस्था FSSAI ने रविवारी बिसलेरीच्या विरोधात कोर्टात केस चालवण्यास मंजूरी दिली आहे. कारण या बाटलीबंद पाण्याचे नमूने दोनदा चाचणीत फेल झाले आहेत. (water brand) याचा अर्थ बिसलेरीचे पाणी पिण्याच्या लायक नसल्याचे या तपासणीत आढळले आहे.

पहिल्या चाचणीत पाण्यात आरोग्यासाठी धोकादायक मानले जाणाऱ्या ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळले. कंपनीने यावर आक्षेप घेतला आणि दुसरी चाचणी घेण्यात आली, परंतु त्यातही पाणी असुरक्षित असल्याचे आढळले. (water brand) यावेळी, पीएएच (PAHs) नावाचे कर्करोग-कारक घटक देखील पाण्यात आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे, पाण्याचे नमुने बाजारातून नव्हे, तर बिस्लेरीच्या आवारातून गोळा करण्यात आले होते. ब्रोमेट आणि पीएएच (PAHs) या दोन्हींना कर्करोग-कारक पदार्थ म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे. बिस्लेरीवरील कारवाईबाबत, एफएसएसएआयने म्हटले आहे की हे पाणी पिण्यास अयोग्य आहे आणि अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत कंपनीवर गुन्हा दाखल केला जाईल. मात्र, या कंपनीने याबद्दल त्यांची बाजू मांडलेली नाही.
५० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या ब्रँडवरील कारवाईने लोकांना धक्का बसला आहे. (water brand) मात्र, एफएसएसएआयने केवळ बिस्लेरीवरच नव्हे, तर इतर कंपन्यांवरही कारवाई केली आहे. FSSAI ने वसंत मसाला प्रायव्हेट लिमिटेड, टिट-बिट फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मीमांसा इंडस्ट्रीज, आणि आशा कन्फेक्शनरी आणि इतर काही खाद्य कंपन्यांविरुद्धही गुन्हे दाखल केले आहेत आणि उत्पादने बाजारातून परत मागवण्याचे आदेश जारी केले आहेत. नियमांचे पालन न केल्यामुळे FSSAI ने उर्मी लाइफसायन्स आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर यांचे परवाने निलंबित केले आहेत. FSSAI ने आशा कन्फेक्शनरीविरुद्ध उत्पादन परत मागवण्याचा आदेश जारी केला असून, त्यांची चॉकलेट भरलेली प्री-पॅकेज्ड बिस्किटे असुरक्षित आढळल्याने कंपनीला ती परत मागवण्याचे निर्देशही दिले आहेत.
हेही वाचा :
ऊस दरवाढ आंदोलन पेटलं विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य
पीएफबद्दल मोठी घोषणा, 90 टक्के रक्कम काढता येणार, 8 महत्वाचे नियम, थेट 3 दिवसात