गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघांना उडवलं चुलत भावांचा जागीच मृत्यू

कोल्हापुरातून अपघाताची मोठी बातमी हाती आली आहे. गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघांना उडवलं आहे. या अपघातात चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला आहे राजस्थानच्या कोटामध्ये धुळ्यातील भाविकांचा 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या दुर्दैवी घटनेनंतर आता कोल्हापुरात अपघाताची भीषण घटना घडली आहे. कोल्हापुरात भीषण अपघात घडला आहे. कोल्हापुरात तरुणाने दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. (Kolhapur) या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात रविवारी मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार उघडकीस आला आहे. गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांच्या मुलाने दोघांना चिरडल्याची घटना घडली. शिवाजी विद्यापीठ परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे. पद्मसिंह रणजितसिंह पाटील याच्या कृत्याने हा अपघात घडला. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस ठाण्यात पद्मसिंह पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात दोघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरच्या (Kolhapur) शहरातील विद्यापीठ मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. पद्मसिंह रणजितसिंह पाटील हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. या भीषण अपघातात उमेश पाथरुड आणि गणेश पाथरुड या दोन सख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन्ही चुलत भावांच्या मृत्यूने पाथरुड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघात झाल्यानंतर आरोपी पद्मसिंह कार घेऊन तातडीने पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी तातडीने पंचनामा केला. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.

कोल्हापुरात घटनेनंतर संतापाची लाट दरम्यान, कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हसह हिट अँड रन आणि इतर कलमांनुसार पद्मसिंहवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोन्ही भावांच्या अपघाती मृत्यूने कोल्हापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. (Kolhapur) आता या प्रकरणात पद्मसिंह पाटीलवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता या प्रकरणात या कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

हेही वाचा : 

ऊस दरवाढ आंदोलन पेटलं विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य

पीएफबद्दल मोठी घोषणा, 90 टक्के रक्कम काढता येणार, 8 महत्वाचे नियम, थेट 3 दिवसात