सांगली येथील उष:काल हॉस्पिटलजवळील तक्षशिला शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फर्निचरला रविवारी सायंकाळी आग लागून नुकसान झाले. (building) अग्निशमन दलाच्या दोन वाहनांच्या सहाय्याने सुमारे तासाभरात ही आग आटोक्यात आणण्यात आली.

शाळा स्थलांतरित झाल्यामुळे ही इमारत गेल्या दोन-तीन वर्षांपासून बंद आहे. (building) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जुने बेंच, खुर्च्या आणि इतर फर्निचर जमा करून ठेवण्यात आले होते. रविवारी सायंकाळी या साहित्याला अचानक आग लागली. इमारतीमधून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली.
अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी भागवत सोनोने यांनी घटनेची तत्काळ दखल घेत घटनास्थळी दोन वाहने रवाना केले. जवानांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत तासाभरात आग आटोक्यात आणली. या आगीत किती आर्थिक नुकसान झाले, (building) याचा नेमका अंदाज अद्याप समजू शकलेला नाही. आग आटोक्यात आणण्याच्या कामात वाहनचालक जावेद मुल्ला, विजय कांबळे तसेच फायरमन रोहन मुळीक, अक्षय माने आणि रामचंद्र चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा :
ऊस दरवाढ आंदोलन पेटलं विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य
पीएफबद्दल मोठी घोषणा, 90 टक्के रक्कम काढता येणार, 8 महत्वाचे नियम, थेट 3 दिवसात