भारतीय जनता पक्षाचे नेते, खासदार अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये जया हुंदाई नावाचे कार शोरुम आहे. या शोरुममध्ये रविवारी दोन चोरटे शिरले. या चोरट्यांनी शोरुममधील तिजोरीच उचलून नेली आहे.
नांदेडमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या जया हुंडाई या शोरुममध्ये चोरी झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. (Ashok Chavan) दोन जणांनी जया हुंडाईमध्ये घुसून रात्री चोरी केल्याचे समोर आले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या शोरुममध्ये चोरी झाल्याचे समोर आले आहे. अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये जया हुंदाई नावाचे कार शोरुम आहे. या शोरुममध्ये रविवारी दोन चोरटे शिरले. या चोरट्यांनी शोरुममधील तिजोरीच उचलून नेली आहे. रविवारी रात्री 9 वाजून 3 मिनिटांनी ही चोरी झाली. चोरी चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Ashok Chavan) त्याचबरोबर एलसीबी आणि फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. याबाबतचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. चोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, जळगावच्या पाचोरा तालुक्यातील गोरडखेडा येथून बेपत्ता झालेल्या डॉक्टर संजय तेली यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आज सकाळी बहुळा धरणातून गोणीत बांधलेला त्यांचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. जमिनीच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.१८ नोव्हेंबर रोजी एक कोटी २५ लाख रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारासाठी डॉक्टर तेली गोरडखेडा येथे आले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोबाईलचे शेवटचे लोकेशन गोरडखेडा येथे मिळाले होते. (Ashok Chavan) तसेच त्यांची कारही परिसरात आढळली होती. पोलिसांनी संशयावरून राहुल धर्मराज पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा :
ऊस दरवाढ आंदोलन पेटलं विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य
पीएफबद्दल मोठी घोषणा, 90 टक्के रक्कम काढता येणार, 8 महत्वाचे नियम, थेट 3 दिवसात