बँकॉक येथील एका लोकप्रिय बारमध्ये रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत 27 जणांचा मृत्यू झाला, तर 63 जण जखमी झाले. थायलंडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत यंत्रणेमधील बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून, (massive) आगीमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

विद्युत बिघाडानंतर काही क्षणांत संपूर्ण बार धुराने भरला थायलंड अग्निशमन विभाग यांना मध्यरात्रीच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुमारे 30 मिनिटांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत इमारतीचा मोठा भाग जळून खाक झाला होता आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. घटनावेळी बारमध्ये उपस्थित असलेल्या एका संगीतकाराने सांगितले की, वीज खंडित होण्यापूर्वी स्टेजजवळील एका सर्किट ब्रेकरमधून धूर बाहेर येताना दिसत होता. (massive) काही क्षणांतच मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर धुराने भरून गेला.
जीव वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या शौचालयाकडे धाव घेतली. मात्र, धुरामुळे गुदमरून अनेकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अनुतिन चर्नविराकुल यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली.ज्वलनशील स(massive) जावटीमुळे आग वेगाने पसरल्याची शक्यता हा बार बँकॉकमधील चाटुचक जिल्ह्यात असून, स्थानिकांमध्ये रॉंग बीअर ना लाट फ्राओ या नावाने प्रसिद्ध आहे. आग विझल्यानंतर परिसरातील छायाचित्रांमध्ये बारबाहेर मोठ्या संख्येने बॉडी बॅग्ज दिसून आल्या. पोलिसांनी संपूर्ण परिसर बंदिस्त केला असून, आतील फर्निचर, भिंती आणि छत पूर्णपणे जळून गेले होते.
बँकॉकचे राज्यपाल चाडचार्ट सिट्टीपंट यांनी सांगितले की, छतावरील ज्वलनशील सजावटीमुळे आग वेगाने पसरली असावी. तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ अनेकजण बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने तो मार्ग अडथळ्यामुळे बंद झाला होता का, याचाही तपास केला जात आहे. फॉरेन्सिक तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत स्पष्ट माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मोटारसायकलस्वार सुरिन जयहार्न यांनी एएफपी शी बोलताना पाच जणांना जळत्या बारमधून बाहेर काढून त्यांच्या अंगावरील आग स्वतःच्या कपड्यांनी विझवल्याचे सांगितले. तसेच एका चालकाने डेली न्यूज ला दिलेल्या माहितीनुसार, दोन जणांना बाहेर काढण्यासाठी त्याने बारच्या खिडक्या फोडून मदत केली.
हेही वाचा :
मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?
चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?