मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे सातत्याने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी अजित पवार यांच्या अपघातावरून देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. (Rohit Pawar) आता या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात देखील त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. डिलिमीटेशन बिलावरून देखील त्यांनी काही आरोप केले आहेत. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डिलिमीटेशन बिलाला पाठिंबा दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत संकेत दिले होते. (Rohit Pawar) त्यामुळे रोहित पवार पक्षात एकटे पडले आहेत का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान यावर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रोहित पवार यांना बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनादरम्यान ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत, यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

रोहित पवार यांना विनंती करतो त्यांच्या सरकारकडून काही मागण्या असतील तर त्यांनी बैठकीला यावं. त्यांच्या मागण्या ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत, मी त्यांना निमंत्रित करतो, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. (Rohit Pawar) दरम्यान रोहित पवार यांना राजकीय मोर्चा काढायचा आहे का? असा सवाल करतानाच बुधवारी त्यांनी आमच्या बैठकीला यावं, समाधान झालं नाही तर मोर्चा काढावा, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी तीन वर्षे जमीन पिकवली नाही तर शासनाकडे जमा करू हा निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नसून राज्यात काही लोकांनी फार्मसाठी 50 एकर 100 एकर जमिनी घेतल्या आहेत, अशा जमिनी आठ आठ वर्षांपासून पडीक आहेत, त्यामुळे देशाचं नुकसान होत आहे, त्यांच्यासाठी असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यामध्ये सर्व सामान्य शेतकऱ्यांचा काही संबंध नाही, हा नियम कुठल्याही सर्वसाधारण शेतकऱ्याला लागू नाही. ज्यांनी जमिनी खरेदी करून लँड बँक तयार केली त्यासाठी हा निर्णय आहे. अशी जमीन छोट्या छोट्या शेतकऱ्यांना भाडे पट्ट्याने देता येते. काही लोकांनी जाणीवपूर्वक अर्थाचा बे अर्थ केला, असंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : 

ऊस दरवाढ आंदोलन पेटलं विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

तरुण तरुणीला घेरलं, दगड, बेल्ट दांडक्याने मारलं, 8 अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचे कृत्य

पीएफबद्दल मोठी घोषणा, 90 टक्के रक्कम काढता येणार, 8 महत्वाचे नियम, थेट 3 दिवसात