सहलीवरुन परतताना भीषण अपघात ५० विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेत ४ मुलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने शाळेच्या बसला मागून जोरदार धडक दिल्याने बस डिव्हायडरला धडकून उलटली. या दुर्घटनेत चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३५ हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कौशांबी येथील सिराथू भागातील ओरिएंटल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी दोन दिवसांच्या सहलीसाठी आग्रा येथे गेले होते. रविवारी सुरू झालेल्या या सहलीनंतर विद्यार्थी, शिक्षक आणि शालेय कर्मचारी बसमधून परतत होते. बसमध्ये अंदाजे ५० जण प्रवास करत होते. (accident) दरम्यान, कन्नौज जिल्ह्यातील थथिया भागातील बैसुइया गावाजवळ हा अपघात झाला.

प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना फ्रेश होण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली होती. (accident) यावेळी चालक बस बाजूला घेत असताना मागून वेगाने आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस डिव्हायडरला धडकून रस्त्यावर उलटली. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास मदत केली.

या भीषण दुर्घटनेत आर्यन चौरसिया (१४), राझी उल्लाह (१७), झैद मिर्झा (१७) आणि अरमान (१७) या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. (accident) तर ३५ हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सहलीचा आनंद घेऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने पालक आणि शाळा प्रशासनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय

सांगलीत बंद शाळेच्या इमारतीतील फर्निचरला आग

राजकारणात मोठा भूकंप 3 आमदार राजीनामा देणार