गिरीश महाजन यांनी नुकताच मोठे विधानकेले कोयनेच्या पाण्यावर त्यांनी भाष्य केले. कोयनेचे पाणी मुंबईला दिले जात असल्याचे आरोप करणाऱ्या रोहित पाटलांनी सर्वात अगोदर अभ्यास करणे आवश्यक आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

गिरीश महाजन यांनी नुकताच मोठे विधान केले. गिरीश महाजन यांनी म्हटले की, 2014 ते 19 दरम्यान कोकणातील प्रकल्प चौकशी लागली. त्यावेळी मुंबईला पाणी पुरवण्यासाठी कोयनेचा विचार झाला. तिथे जलविद्युत प्रकल्प आहे याठिकाणी वीज निर्मितीनंतर पाणी समुद्रात जाते. मधे त्याचा काहीही उपयोग नाही. लोटे इंडस्ट्रीला पाव टीएमसी पाणी जाते. (Girish Mahajan) म्हणून हे पाणी मुंबईला आणायचा विचार झाला. मधे ज्या एमआयडीसी लागतात, त्यांना ही पाणी देण्याचा विचार झाला. उरलेले पाणी मुंबईला आणायचे ठरले. ही मागची योजना होती. तिला चालना द्यायचे ठरले.
आपण सांगली सातारा किंवा कोयना धरणातील पाणी घेत नाही. जे पाणी वीज निर्मितीनंतर समुद्रात जाते ते घेऊन जात आहोत, (Girish Mahajan) थोडासा अभ्यास केला पाहिजे. परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे, कुणाचे ही पाणी याठिकाणी घेतले जात नाही. विरोधकांबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, कुणाच्या मनात शंका असेल तर बैठक घेऊ. आम्ही सर्व परिस्थिती समोर ठेवू. हा जुना विषय आहे. रोहित पाटील यांच्याबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, (Girish Mahajan) आपण थोडा तरी अभ्यास केला पाहिजे. सातारा किंवा सांगलीचे हे पाणी नाही. वीज निर्मितीनंतर वशिष्ठी नदीतून समुद्रात जाते. तेच पाणी आपण घेऊन जात आहोत.
जळगावातील कुटुंबाला सुरतमध्ये कालव्यात ढकलून दिल्याच्या घटनेवर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, मला आताच कळाले. गंभीर घटना आहे. कामाला गेल्याचे कळाले. नेमके काय झाले याची माहिती घेतोय. बेपत्ता झाल्याचे कळाले. एक मुलगा वाचला त्याने पोलिसांना माहिती दिली. मी एसपींसोबत संपर्क करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय टाकतोय. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, आम्ही महायुती म्हणून लढत आहोत. 12 ठिकाणी बिनविरोध आम्ही जिंकलो आहोत. 9 ठिकाणी लढत असून विरोधकांचे डिपॉजिट जप्त करू. महाविकास आघाडीचे उमेदवारच नाहीत. तुमचे पँनल नाही, मग मागणी व शंखनाद कशाला करत आहात.
हेही वाचा :
इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित
कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच
नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट