डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या RBI ने जाहीर केली यादी

२०२६ या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण डिसेंबरमध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार तसेच ख्रिसमस आणि विविध राज्यांतील स्थानिक सणांमुळे बँकांना अनेक सुट्ट्या असणार आहेत. (holidays) त्यामुळे बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सुट्ट्यांचे कॅलेंडर तपासणे आवश्यक आहे.

डिसेंबर २०२६ मध्ये नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळे देशभरातील बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. ६, १३, २० आणि २७ डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. (holidays) याशिवाय १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि २६ डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकांच्या शाखा बंद राहतील. २५ डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.काही राज्यांमध्ये स्थानिक सण आणि विशेष दिवसांमुळे अतिरिक्त सुट्ट्याही असतील. सिक्कीम आणि मेघालयमधील बँकांना डिसेंबरमध्ये तुलनेने अधिक सुट्ट्या असणार आहेत. सिक्कीममध्ये ९, १० आणि ११ डिसेंबर रोजी लोसूंग आणि नामसूंग उत्सवामुळे बँका बंद राहतील. तर मेघालयमध्ये १८ डिसेंबरला यू सोसो थाम पुण्यतिथी, २४ डिसेंबरला ख्रिसमस ईव्ह आणि ३० डिसेंबरला यू कियांग नांगबाह पुण्यतिथीनिमित्त बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

याशिवाय १ डिसेंबरला अरुणाचल प्रदेशात, ३ डिसेंबरला गोव्यात आणि १९ डिसेंबरला गोवा मुक्तिदिनानिमित्त बँकांना सुट्टी असेल. २४ डिसेंबरला मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये, तर ३१ डिसेंबरला मिझोराममध्ये बँका बंद राहतील. (holidays) दरम्यान, बँकांच्या शाखांना सुट्टी असली तरी ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग सेवांचा वापर करता येणार आहे. यूपीआय, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहतील. तसेच एनईएफटी आणि आरटीजीएससारख्या ऑनलाइन सुविधांचाही वापर करता येईल. मात्र, चेक क्लिअरन्स, केवायसी, डिमांड ड्राफ्ट किंवा बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून करावी लागणारी महत्त्वाची कामे असतील, तर ती सुट्ट्यांपूर्वीच पूर्ण करणे फायद्याचे ठरेल. विशेष म्हणजे, बँकांच्या सुट्ट्या राज्य आणि शहरानुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी आपल्या परिसरातील सुट्टीची माहिती आरबीआयच्या अधिकृत हॉलिडे कॅलेंडरवर तपासून घ्या.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या