कोल्हापूर जिल्ह्यातून प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्गावरून शासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष आता तीव्र झाला आहे. करवीर तालुक्यातील १७ गावांच्या हद्दीतून हा मार्ग जाणार असल्याने प्रशासनाने ऑनलाईन तारखा जाहीर करून मोजणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे तो प्रयत्न फसल्याचे चित्र करवीर तालुक्यात दिसत आहे.
वाकरे, खुपीरे, साबळेवाडी, कुडित्रे, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला अशा मार्गाचे मोजणीचे नियोजन प्रशासनाने ऑनलाईन जाहीर केल्याचे बाधित शेतकऱ्यांना समजले होते. (Farmers) त्यामुळे शुक्रवारी सकाळी ६ पासूनच वाकरेसह परिसरातील शेकडो शेतकरी वाकरे फाट्यावर जमा झाले होते. हे शेतकरी दुपारपर्यंत भर उन्हात नियोजित महामार्गाच्या शेतात ठाण मांडून बसले होते. मात्र प्रशासनाचे अधिकारी फिरकलेच नाहीत. आम्हाला तुमचा मोबदलाही नको आणि रस्ताही नको. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेतीची मोजणी करू देणार नाही आणि जमीनही देणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच बाजीराव देवाळकर यांनी खडे बोल सुनावले.

कुणाला भकास करून कुणाचा विकास होत असेल, तर अशा विकासाला आमचा ठाम विरोध आहे, अशा शब्दांत जि.प सदस्या रसिका पाटील यांनी संताप व्यक्त केला. आमचा कर्मचाऱ्यांना विरोध नाही, तर शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे, असे कुंभी कारखान्याचे संचालक अनिल पाटील यांनी रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी नसताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास शासन का करत आहे, असा सवाल करीत हा महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू, असा इशारा ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी दिला. (Farmers) यावेळी जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील, कॅ. उत्तम पाटील, अमर पाटील, कुंभीचे संचालक डॉ. बी. बी. पाटील, अनिल पाटील, पंचायत समिती सदस्या लता दीपक माने, दीपक माने, संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्योतीराम घोडके, बाजीराव देवाळकर, भगवान यादव, मुकुंद पाटील, के. एम. किरुळकर, पी. डी. राऊतव शेतकरी उपस्थित होते.
एकीकडे सरकार ‘लाडकी बहीण’ म्हणत आमच्याविषयी आपुलकी दाखवते आणि दुसरीकडे याच बहिणींच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असणारी शेती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. शेतीच गेली तर आमच्या कुटुंबाने जगायचे कसे? हीच का भावाची बहिणीला भाऊबीज आणि आपुलकी, असा संतप्त सवाल वाकरे येथील शेतकरी महिलांनी केला.
नवे पारगाव शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे रविवार (ता. २९) पासून जमिनीच्या सीमांकनासाठी यंत्राद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र, या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आक्रमक झाली आहे. पन्हाळा आणि करवीर तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी आठ वाजता मोठ्या संख्येने जमा होण्याचे आवाहन समितीने केले आहे. (Farmers) त्यामुळे पारगाव येथे सर्वेक्षणाच्या दिवशी संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या मोनेच सर्व्हेअर संस्थेमार्फत पारगाव येथील प्रस्तावित महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या सीमांकनाची नोंद घेण्यात येणार आहे. यासाठी २९ नोव्हेंबरपासून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने २३ नोव्हेंबर रोजी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख