‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहण्याची 5 मोठी कारणं, सलमानच्या कॅमिओसह रितेशच्या सिनेमा बनवतायेत अधिक प्रभावी

रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा स्टारर ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटगृहांसह बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. (huge response) विशेष म्हणजे रितेश देशमुखने या सिनेमात केवळ अभिनयच नाही, तर दिग्दर्शनाची जबाबदारीही समर्थपणे सांभाळली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्या कामाचं मोठं कौतुक होत आहे.

या सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्याने भूमिकेला पूर्ण न्याय दिल्याची भावना चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. याआधी अनेक वेगळ्या भूमिका साकारणाऱ्या रितेशचा हा गंभीर आणि प्रभावी अवतार प्रेक्षकांना विशेष भावला आहे. त्याचा लूक, चेहऱ्यावरील भाव आणि व्यक्तिमत्त्वामुळे पडद्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा जिवंत झाल्याचं बोललं जात आहे.

सिनेमात सलमान खानची छोटी पण दमदार भूमिका आहे. त्याने जीवा महाला यांची व्यक्तिरेखा साकारली असून त्याची एन्ट्री होताच चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट होत असल्याचं सांगितलं जात आहे. कमी वेळेची भूमिका असूनही त्याच्या उपस्थितीने सिनेमाला वेगळी उंची मिळाल्याची चर्चा आहे.

या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन आणि फरदीन खान यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ९० च्या दशकातील लोकप्रिय कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे.

रितेश आणि जिनिलिया यांची जोडीही या सिनेमातील खास आकर्षण ठरत आहे. यापूर्वी अनेक चित्रपटांत एकत्र झळकलेल्या या जोडीची केमिस्ट्री पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळत आहे. जिनिलियाने या सिनेमाची निर्मितीही केली आहे, तर रितेशने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

‘राजा शिवाजी’ या सिनेमाचं संगीतही प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. दमदार पार्श्वसंगीत, भव्य लढाईची दृश्यं आणि उत्कृष्ट व्हीएफएक्समुळे सिनेमा अधिक प्रभावी ठरत आहे. ऐतिहासिक विषय, मोठी स्टारकास्ट आणि भव्य सादरीकरणामुळे ‘राजा शिवाजी’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दिसत आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

 गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल