5 की 6 मे अंगारकी चतुर्थीचा उपवास कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

हिंदू धर्मात भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दर महिन्याला येणारी ही चतुर्थी विशेषतः फलदायी असते. चला जाणून घेऊयात की मे महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीचा उपवास केव्हा पाळला जाईल.

हिंदू धर्मात गणपतीला पूजनीय देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते.(Sankashti Chaturthi) त‍र ही तिथील खूप विशेष असेल कारण यावेळी मंगळवारी ही संकष्टी चतुर्थी येत असल्याने ही अंगारकी चतुर्थी दुर्मिळ योगासोबत येत आहे. चला तर मग या चतुर्थीच्या उपवासाची नेमकी तारीख, चंद्रोदयाची वेळ आणि या दिवसाचे विशेष महत्त्व आजच्या लेखात जाणून घेऊयात.

अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे?
पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 5 मे 2026 रोजी सकाळी 5 वाजून 24 मिनिटांनी सुरू होईल आणि 6 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी संपेल. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदयतिथीच्या आधारावर केला जातो. त्यामुळे 5 मे रोजी चतुर्थी तिथी चंद्रोदयाच्या वेळी असेल (Sankashti Chaturthi) म्हणून अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास मंगळवार 5 मे 2026 रोजी केला जाईल.

अंगारकी संकष्टी चतुर्थीला पूजा करण्याची पद्धत
अंगारकी संकष्टी चतुर्थीला ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा.
त्यानंतर हातात पाणी घेऊन उपवास करण्याचा संकल्प करा.
देव्हाऱ्यातील गणपतीचा फोटो किंवा मुर्तीला गंगाजलाने अभिषेक करून तांदळाचे दाणे, फुल, गंध,धुप तसेच दिवा व दुर्वा अर्पण करा.
पुजा करून झाल्यावर गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवा.
पूजा झाल्यानंतर ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा आणि संकष्टी चतुर्थीची कथा वाचावी किंवा ऐकावी. रात्री चंद्राचे दर्शन करून उपवास सोडावा.
अंगारकी चतुर्थीचा महान योगायोग
या वर्षी एकदंत संकष्टी चतुर्थी मंगळवारी आहे. शास्त्रानुसार जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. अंगारकी चतुर्थीचे फायदे इतर चतुर्थी दिवसांपेक्षा कित्येक पटीने जास्त असतात. ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष किंवा मंगळाचा जास्त प्रभाव आहे त्यांनी या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करावी. (Sankashti Chaturthi) यामुळे मंगळाचे अशुभ प्रभाव शांत होण्यास आणि कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते. या दिवशी शिवयोग देखील निर्माण होतो, जो आध्यात्मिक साधना आणि ध्यानासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?