हनी सिंग बादशाहचा वाद पुन्हा पेटला! ‘त्या’ कमेंटमुळे राडा, नेमकं घडलं तरी काय?

रॅपर आणि गायक बादशाहने अलीकडेच ब्रिटिश गायिका दुआ लिपाबद्दल सोशल मीडियावर एक वादग्रस्त कमेंट केली होती, (controversy )ज्यामुळे तो खूप चर्चेत आला. शुक्रवारी, ६ जून रोजी ‘एक्स’ हँडलवर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना बादशाह म्हणाला होता की, “तिच्यासोबत दुआ लिपा मुलं जन्माला घालायला आवडतील.” ही कमेंट लोकांना अजिबात आवडली नाही.

अनेकांनी बादशाहला घृणास्पद म्हटले. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या कमेंटला ‘एक सुंदर तारीफ’ उत्कृष्ट प्रशंसा असे म्हणत सारवासारव केली. आता याच वादात प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगची एन्ट्री झाली आहे, त्याने बादशाहच्या कमेंटवर मिश्किल कमेंट करत अप्रत्यक्ष टीका केली आहे.आपल्या कमेंटवर स्पष्टीकरण देताना बादशाहने ‘एक्स’ हँडलवर लिहिले होते, “मला असे वाटते की कोणत्याही महिलेला सर्वात चांगली प्रशंसा हीच असते की, तिला तुम्ही आपल्या मुलांची आई म्हणून पाहता. माझी विचारसरणी नाही, तुमची विचारसरणी समोर आली आहे.”(controversy ) बादशाहने टीकेचा सामना केल्यानंतर ही पोस्ट केली होती.

बादशाहच्या दुआ लिपाबद्दलच्या कमेंटवर हनी सिंगने उपहासात्मक शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. शनिवारी, ७ जून रोजी हनी सिंगने बादशाहच्या वादावर आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्याने फक्त ‘जीनियस’ असे लिहिले आणि सोबत हसणारे आणि टाळ्या वाजवणारे इमोजी वापरले. हे पाहून असे वाटतेय की, बादशाह काय बोलून गेला, (controversy )हे ऐकून तो अक्षरशः हसून लोटपोट झाला आहे आणि त्याच्यावर टोमणा मारत आहे.

बादशाह आणि हनी सिंग यांच्यात गेल्या १५ वर्षांपासून वाद सुरू आहे. दोघांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘माफिया मुंडीर’ या रॅप ग्रुपचे सदस्य म्हणून केली होती, ज्यात इक्का, लिल गोलू आणि रफ्तार यांचाही समावेश होता. या बँडने ‘खोल बोतल’, ‘बेगानी नार बुरी’ आणि ‘दिल्ली के दिवाने’ यांसारखी अनेक हिट गाणी दिली होती. पण, त्यांच्यातील वादामुळे दोघे वेगळे झाले आणि तेव्हापासून ते सोशल मीडियावर एकमेकांवर टोमणे मारत असतात.आता इतक्या वर्षांच्या जुन्या भांडणादरम्यान, हनी सिंगने बादशाहच्या या नव्या वादग्रस्त कमेंटवर दिलेली ही प्रतिक्रिया अनेकांना आश्चर्यचकित करत आहे. त्यांच्यातील ही जुनी दुश्मनी पुन्हा एकदा उफाळून येणार का, हे पाहणे रंजक ठरेल!

हेही वाचा :