गप्प राहून पार्टनर कंट्रोल करतोय नातं? कदाचित असू शकते सायलंट मॅनिप्युलेशन

नाते हे विश्वास, आदर, संवाद आणि समजुतीच्या पायावर दोन माणसांमध्ये दृढ होत असते. (relationship )पण कधीकधी नात्यात अशा अनेक गोष्टी येऊ लागतात, ज्या हळूहळू तुमच्या नात्याला पोखरू लागतात. अशीच एक गोष्ट म्हणजे ‘सायलेंट मॅनिपुलेशन’. तुमचा जोडीदार काहीही न बोलता, जबरदस्ती न करता तुम्हाला मानसिकरित्या अडकवतो आणि तुम्हाला त्याबाबत काहीच कळत नाही.

तुम्हाला कळतही नाही आणि तुम्ही अशा नात्यात जाता जिथे तुम्हाला कोणताही विचार येत नसतो जोडीदार जे म्हणेल तेच तुम्हाला योग्य वाटते, आत्मविश्वास आणि आनंद असा या नात्यात उरत नाही. सायलेंट मॅनिपुलेशन म्हणजे काय आणि कसे होते हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. समुदेशक अजित भिडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे

असे जाणवून देत असेल की तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही त्यांना दुखावले आहे किंवा प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही स्वतःलाच दोषी ठरवत असाल, तर समजून घ्या की तुमचा जोडीदार तुम्हाला सायलंट मॅनिप्युलेट करत आहे. तुमचे जोडीदार सर्वकाही अशा प्रकारे गोष्टी करू लागतात की तुम्हाला वाटू लागते की ती तुमची चूक आहे. यामुळे तुम्ही स्वतःलाच दोष देता आणि आत्मविश्वासही नाहीसा होतो

तुमच्या जोडीदाराला सायलंट ट्रीटमेंट देणे हादेखील सायलंट मॅनिप्युलेशनचा एक प्रकार आहे. जर तुमचा जोडीदार रागात काही बोलल्यानंतर किंवा चूक केल्यानंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागला किंवा प्रतिक्रिया न देता पूर्णपणे गप्प बसला तर त्याला सायलंट मॅनिप्युलेशन म्हणतात.(relationship तुम्हाला मनातून चुकीचे वाटत राहते आणि तुम्ही काहीही बोलू शकत नाही आणि तुमची घुसमट होते

जर तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेऊ इच्छित नसेल आणि तुमच्या भावना इतक्या मोठ्या नाहीत असे तुम्हाला पटवून देत असेल, तर तो सायलंट मॅनिप्युलेशन करत आहे. म्हणजे नक्की काय तर, जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या भावनांबद्दल सांगाल तेव्हा तो म्हणू लागेल, “एवढ्या छोट्या गोष्टीबद्दल इतका विचार का करायचा?” किंवा “हे असं काहीच नाही.”

तेव्हा तुम्हालाही वाटू लागते की आपण एखाद्या गोष्टीचा खरंच बाऊ करत आहोत की काय?(relationship मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. गोष्ट लहान असो वा मोठी जोडीदाराने ऐकून घेणे आणि त्यावेळी तुम्हाला शांत करणे त्यावर बोलणे अपेक्षित आहे. तुम्हाला हे सर्व संकेत दिसत असतील तर तुम्ही वेळीच आपल्या जोडीदारापासून दूर होणे गरजेचे आहे. कारण या सगळ्यात तुम्ही स्वतःला गमावत आहात हे लक्षात घ्या आणि याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो.

हेही वाचा :