लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान(claims) प्रक्रिया पार पडत आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्यातच आता राहुल गांधींनी महिलांसाठीच्या महालक्ष्मी योजनेची माहिती देताना एक दमदार दावा केला आहे.
राहुल गांधी म्हणतात, १ जुलै २०२४ रोजी सकाळी जेव्हा देशातील महिला(claims) आपलं बँक अकाऊंट चेक करतील तेव्हा त्यांच्या खात्यात ८ हजार ५०० रुपये आलेले असतील. देशातील कोट्यवधी गरीब महिलांच्या खात्यात जादूने साडेआठ हजार रुपये येतील.
राहुल गांधी पुढे म्हणतात, जुलैमध्ये पैसे येतील, ऑगस्टमध्ये येतील, सप्टेंबरमध्ये येतील, ऑक्टोबरमध्ये येतील.. वर्षभरात पन्नास हजार नाही, साठ हजार नाही, सत्तर हजार नाही तर तब्बल एक लाख रुपये येतील. देशातल्या कोट्यवधी गोरगरीब महिलांना याचा लाभ मिळेल. खटाखट-खटाखट पैसे पडतील.
राहुल गांधींच्या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ४ जून रोजी मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. जर इंडिया आघाडीला बहुमत मिळालं तर तिथून पुढे शपथविधी, खातेवाटप आणि कामकाज सुरु होण्यासाठी लागणार वेळ. त्यामुळे राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे खरंच १ जुलै २०२४ रोजी महिलांच्या खात्यावर ८ हजार ५०० रुपये येतील का? असा प्रश्न नेटकरी विचारीत आहेत.
हेही वाचा :
इचलकरंजीत तरुणाचा पाठलाग करून खून….
हातकणंगलेत डंपर दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
‘…अन्यथा शिक्षा व्हायला हवी’; मतदान न करणाऱ्यांवर सुबोध भावे भडकला